situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Metro : पुणे मेट्रो टप्पा-२ अंतर्गत हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर–सासवड रस्ता उपमार्गिकांना मान्यता

Published On:
pune metro

Team My Pune City – पुणे मेट्रोच्या टप्पा-२ प्रकल्पाला (Pune Metro) गती मिळाली आहे. हडपसर–लोणी काळभोर आणि हडपसर बस डेपो–सासवड रस्ता या दोन उपमार्गिकांच्या अंमलबजावणीस मंत्रिमंडळ पायाभूत सुविधा समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. ही बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या निर्णयामुळे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले आहे.

Leopard in the Manchar : मंचरमधील बिबट्या जेरबंद …पण नरभक्षक असल्याची खातरजमा अद्याप बाकी

या दोन उपमार्गिकांची एकूण लांबी १६ किलोमीटर असून त्यात १४ उन्नत स्थानकांचा समावेश असेल. प्रकल्पासाठी अंदाजे ५ हजार ७०४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. महा मेट्रोमार्फत या पूर्णतः उन्नत मार्गिकांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील वाहतूक कोंडी कमी होईल, पूर्वेकडील ग्रामीण भागाला मेट्रोची जोडणी मिळेल आणि प्रवाशांना जलद व सुरक्षित प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास अजित पवार यांनी(Pune Metro) व्यक्त केला.

Meghatai Bhagwat : ग्रामदैवत बोधलेबुवा महाराजांच्या दर्शनानंतर मेघाताई भागवत यांचा दौरा ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

हडपसर, फुरसुंगी, लोणी काळभोर आणि सासवडसारख्या वेगाने वाढणाऱ्या उपनगरांना या मेट्रो मार्गिकांमुळे थेट जोडणी मिळणार आहे. प्रवासाचा वेळ वाचण्याबरोबरच प्रदूषण कमी करण्यासही मदत होईल, अशी माहिती पवार यांनी(Pune Metro) दिली.

महामेट्रोने या प्रकल्पाचा सविस्तर अहवाल २०२३ मध्ये सादर केला होता. त्यानंतर एनएचएआय आणि पीएमआरडीए यांच्यासोबत चर्चा करून फेब्रुवारी २०२५ मध्ये पुणे महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. खडकवासला–स्वारगेट–हडपसर–खराडी असा ३१.६४ किलोमीटरचा मुख्य मार्ग प्रस्तावित असून, मार्च २०२५ मध्ये तो केंद्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. मात्र, अद्याप केंद्र सरकारकडून अंतिम मान्यता मिळालेली (Pune Metro) नाही.

राज्य शासनाच्या निर्देशानुसार जमीन अधिग्रहण, पर्यावरणीय मंजुरी आणि निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. या प्रकल्पामुळे पूर्व आणि दक्षिण पुण्यातील नागरिकांना मध्यवर्ती भागात सहज प्रवास करता येईल. उपनगरीय वाहतूक कोंडी आणि प्रदूषण कमी करण्यास मोठा हातभार लागेल, असा अंदाज महामेट्रोकडून व्यक्त करण्यात आला (Pune Metro) आहे.

Follow Us On