Team My Pune City -पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी व स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्ग विस्ताराला मान्यता मिळाली असून पीसीएमसी ते निगडी या मार्गिकेचे काम वेगाने सुरू आहे. लवकरच स्वारगेट ते कात्रज मार्गीकेच्या बांधकामासाठी ठेकेदाराची नेमणूक करण्यात येणार आहे. या दोन्ही मार्गीकांसाठी नवीन १२ मेट्रो ट्रेनची आवश्यकता भासणार आहे प्रत्येक मेट्रो ट्रेनला ३ डबे असतील.
पुणे मेट्रोने ‘टीटागढ रेल सिस्टिम लिमिटेड’ आणि ‘टीटागढ फिरेमा’ या दोन्ही कंपन्यांना मिळून या १२ नवीन मेट्रो ट्रेनच्या खरेदीची ऑर्डर दिली आहे. या नवीन मेट्रो ट्रेन संपूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ अंतर्गत तयार करण्यात येणार असून पूर्वीच्या मेट्रो ट्रेन प्रमाणे अल्युमिनिमपासून निर्मित असणार आहेत. या खरेदी कराराची एकूण रक्कम ४३०.५३ कोटी रुपये इतकी आहे. पुढील ३० महिन्यांच्या कालावधीत या मेट्रो ट्रेन टप्प्याटप्प्याने पुणे मेट्रोकडे दाखल होतील.
Katraj: चार वर्षांच्या चिमुकलीचा थरारक बचाव! अग्निशमन जवानाच्या सतर्कतेमुळे टळला मोठा अनर्थ
Pavana Dam : पवना व आंद्रा धरणाच्या पाणीपातळीत मोठी वाढ,पवना 77 टक्के तर आंद्रा 92 टक्के


या नवीन १२ ट्रेन सध्या मेट्रोच्या ताफ्यात असणाऱ्या ट्रेन सारख्याच असतील. संपूर्णतः वातानुकूलित, स्वयंचलित दरवाजे, स्वयंचलित उद्घोषणा व डिस्प्ले. या १२ नवीन ट्रेन दाखल झाल्यावर पुणे मेट्रोच्या ट्रेन्सची संख्या ४६ ट्रेन (३४ सध्याच्या ट्रेन + १२ नवीन ट्रेन) इतकी होणार आहे.
महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी म्हटले आहे की, “पुणे मेट्रोच्या पीसीएमसी ते निगडी या विस्तारित मार्गांसाठी नवीन १२ ट्रेनची ऑर्डर महामेट्रोने दिलेली आहे. यामुळे या विस्तारित मार्गिकेचे बांधकामाचे पूर्ण झाल्यानंतर लगेच मेट्रो सेवा पुरवणे शक्य होणार आहे. यामुळे पीसीएमसी ते निगडी या मार्गातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.”