Team My Pune City – कोंढव्यातील येवलेवाडी भागात अमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत एका नायजेरियन नागरिकाला मेफेड्रोन विक्री प्रकरणात अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून तब्बल १२ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, यात १२ लाख ४४ हजार रुपये किमतीचे ६२ ग्रॅम मेफेड्रोन, दोन मोबाईल संच व एक दुचाकी यांचा समावेश आहे.
व्हेलेंटाइन ऊर्फ जेम्स अमुचे ईझेजा (वय ३५, सध्या रा. येवलेवाडी,(Pune) कोंढवा, मूळ रा. नायजेरिया) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकारी व कर्मचारी कोंढवा परिसरात गस्त घालत असताना त्यांना व्हेलेंटाइन मेफेड्रोन विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून संशयिताला दुचाकीसह अटक केली. त्याची तपासणी केली असता त्याच्याकडे मेफेड्रोन आढळून आले.
Maval: मावळात ललिता पंचमी निमित्त भव्य कुंकुमार्चन सोहळा – हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
Vadgaon Maval: युवकांच्या सक्षमतेवर देशाची सक्षमता अवलंबून – पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल
Pune Airport: पुणे विमानतळावर ई-मेलद्वारे बॉम्बची धमकी; तपासानंतर अफवा असल्याचे उघड
पोलिसांनी आरोपीकडून मेफेड्रोन, दुचाकी तसेच दोन मोबाईल संच असा एकूण १२ लाख ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी नेमका कोणाला मेफेड्रोन विक्री करणार होता आणि त्याने हे अमली पदार्थ कोठून आणले, याबाबत सखोल तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई पोलीस उपायुक्त निखील पिंगळे व सहायक आयुक्त विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे यांच्या पथकाने केली. या कारवाईत सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, उपनिरीक्षक दिंगबर कोकाटे, संदीप शिर्के, मारुती पारधी, विशाल दळवी, रेहाना शेख, दयानंद तेलंगे, सर्जेराव सरगर, विनायक दळवी, नागनाथ राख, विपुन गायकवाड व अक्षय शिर्के यांनी सहभाग घेतला.