situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune:पुण्यात अंमली पदार्थ विरोधी पथकाची मोठी कारवाई हडपसर व खिडकीतून एकूण ७.८८ लाखांचा अंमली पदार्थ जप्त; ५ आरोपी अटकेत

Published On:

Team MyPuneCity –अंमली पदार्थ विरोधी पथक-२, गुन्हे शाखा, पुणे शहर यांच्या पथकाने हडपसर आणि खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन स्वतंत्र कारवायांमध्ये सुमारे ७ लाख ८८ हजार रुपयांचा अफूच्या बोंडांचा चुरा (पॉपी स्ट्रॉ) व गांजा असा अंमली पदार्थ जप्त केला आहे. या कारवायांमध्ये एकूण पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.

हडपसरमधील कारवाई :
१२ जुलै २०२५ रोजी पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व त्यांच्या पथकाने हडपसर परिसरात पेट्रोलिंग दरम्यान मांजरी रोड चौकाजवळ संशयित हालचालीवरून कारवाई केली.

Talegaon Dabhade:श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांच्या ६७५ व्या समाधी सोहळ्याच्या निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन


तेथे राकेश अर्जुनदास रामावत (वय ४१, रा. उरुळी कांचन, पुणे) आणि ताराचंद सिताराम जहांगिर (वय २६, रा. उरुळी कांचन, पुणे) या दोघांकडून ३ किलो ५६० ग्रॅम अफीमच्या बोंडांचा चुरा (पॉपीस्ट्रॉ) व इतर मुद्देमाल असा एकूण २,१५,५००/- रुपये किंमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खडकीतील कारवाई :
त्यानंतर खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत, जोग सेंटरसमोर, जुना मुंबई-पुणे महामार्ग वाकडेवाडी येथे पेट्रोलिंग दरम्यान करण्यात आलेल्या दुसऱ्या कारवाईत भागवत शिवाजी मंडलीक (वय २६, रा. रहाटणी), मुसीम सलीम शेख (वय २४, रा. शिरुर कासार, जि. बीड), महेश नारायण कळसे (वय २४, रा. शिरुर कासार, जि. बीड) यांच्याकडून २१ किलो ८६० ग्रॅम गांजा व इतर ऐवज असा एकूण ५,७२,६००/- रुपये किमतीचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला.

Pune Terrorist Case : पुण्यातील घातपात प्रकरणातील संशयित दहशतवाद्याला अटक

ही संपूर्ण कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे, सहायक आयुक्त (गुन्हे-२) राजेंद्र मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस उपनिरीक्षक अस्मिता लाड व अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे पोलीस अंमलदार प्रफुल्ल मोरे, नितीन जगदाळे, योगेश मांजर, संदीप जाधव, उदय राक्षे, चेतन गायकवाड, प्रशांत बोमादंडी, मयूर सूर्यवंशी, साहिल शेख, रविंद्र रोकडे, आझाद पाटील, शेखर खराडे, दिशा खेवलकर यांनी सहभाग घेतला.

Follow Us On