Team My pune city –महाराष्ट्रीय कलोपासकचे (Pune)माजी चिटणीस कै. राजाभाऊ नातू यांच्या 31व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी ज्येष्ठ लेखक सतीश आळेकर लिखित ‘महापूर’ या नाटकाचा प्रयोग भरत नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आला होता. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेतील स्पर्धक आणि रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात प्रयोग रंगला.
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धेतील प्रयोग नेटका कसा असावा याचे मार्गदर्शन मिळण्यासाठी कै. राजाभाऊ नातू यांच्या स्मृतिदिनानिमित्त नाट्य प्रयोगाचे आयोजन केले जाते.
Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबीर!
Sant Tukaram Palkhi : माऊलींच्या अनुपम भेट सोहळ्यानंतर संत तुकोबारायांचे देहुकडे प्रस्थान
लेखन, दिग्दर्शन आणि अभिनय या मुद्द्यांवर स्पर्धकांनी अधिक लक्ष केंद्रीत करावे, असा स्पर्धा संयोजक म्हणून महाराष्ट्रीय कलोपासकचा आग्रह असतो. ‘महापूर’ या नाटकात आरोह वेलणकर, प्रसाद वनारसे, रेशम श्रीवर्धनकर, धीरेश जोशी, रेणुका दफ्तरदार, दिलीप जोगळेकर यांच्या भूमिका होत्या. तर ऋषी मनोहर यांनी नाटकाचे दिग्दर्शन केले होते. या प्रयोगात सहभागी कलाकारांनी पुरुषोत्तम स्पर्धा गाजविली आहे.
सुमारे 13 वर्षांपूर्वी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या निमित्ताने भरत नाट्य मंदिरातील रंगमंचावर पाऊल ठेवले होते. ‘महापूर’ या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा महाराष्ट्रीय कलोपासकसाठी या रंगमंचावर येण्याची संधी मिळाल्याचे आरोह वेलणकर यांनी आवर्जून सांगितले.