महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या(Pune) मान्यतेने व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने “ सतेज संघ,बाणेर यांच्या वतीने “ कबड्डी महर्षी स्व. शंकरराव ऊर्फ बुवा साळवी चषक निमंत्रित पुरुष व महिला राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा – २०२५ व “ बाबुराव चांदेरे सोशल फाउंडेशन यांच्या विद्यमाने पुरुष व महिला “ पुणे लिग कबड्डी स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी पुणे लीग कबड्डी स्पर्धेत पुरुष विभागात माय मुळशी व बलाढ्य बारामती व महिला विभागात —शिवनेरी जुन्नर व बलाढ्य बारामती उपांत्य फेरीत दाखल झाले.
पुरुष विभागात झालेल्या सामन्यात सिंहगड हवेली संघाने शिवनेरी जुन्नर संघावर ५९-३३ अशी दणदणीत मात केली. मध्यंतराला सिंहगड हवेली संघाकडे ३०-१७ अशी आघाडी होती. सिंहगड हवेली संघाच्या राज राठोड व अविनाश काकडे यांनी जोरदार चढाया करीत विजय मिळविला. स्वराज जाधव व आदित्य कांबळे यांनी सुरेख पकडी घेतल्या. शिवनेरी जुन्नर संघाच्या धिरज सुतार व अभिजीत कटाळे यांनी आशु महेश व सुनिल शेट्टी यांनी पकडी केल्या. दुसऱ्या सामन्यात बलाढ्य बारामती संघाने माय मुळशी संघावर ४३-३५ अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला बलाढ्य बारामती संघाकडे २१-१७ अशी आघाडी होती. अनिकेत कांबळे व योगेश ठोंबरे यांनी जोरदार चढाया केल्या. संभाजी व सौरभ यांनी चांगल्या पकडी घेतल्या. माय मुळशीच्या महेश माने व आशफाक तांबोळी यांनी चांगला खेळ केला. तर प्रविण बाबर व शंतनु भोर यांनी पकडी केल्या.
Maval Crime News : आदिवासी महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीला अटक
महिला विभागात सिंहगड हवेली संघाने वेगवान पुणे संघावर ३८-३५ अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला सिंहगड हवेली संघाकडे २३-१९ अशी आघाडी होती. सिंहगड हवेलीच्या प्रांजल थेटे व साक्षी रावडे, महेश्वरी वाघ यांनी आक्रमक खेळ करीत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. सिफा वस्ताद व काजल टमाटे यांनी पकडी घेतल्या. वेगवान पुणे संघाच्या सानिया मिर्झा ज्ञानेश्वरी लांडे यांनी चांगला प्रतिकार केला. नेहा चव्हाण वन सिध्दी मराठे यांनी पकडी घेतल्या. दुसऱ्या सामन्यात शिवनेरी जुन्नर संघाने बलाढ्य बारामती संघावर २६-२५ निसटता विजय मिळविला. शिवनेरी जुन्नर संघाच्या किर्ती गडगंची व अंकिता पिसाळ यांनी चौफेर चढाया केल्या. तर प्रियंका मांगलेकर हिने पकडी घेतल्या. बलाढ्य बारामतीच्या वैभवी जाधव व वर्षा बनसुडे यांनी चांगल्या चढाया केल्या. तर सिध्दी बलकवडे हिने पकडी घेतल्या.