Team My Pune City – ओळख श्री ज्ञानेश्वरी एक परिवार (Pune)यांचे वतीने संत साहित्याचा प्रचार आणि प्रसारांतर्गत शालेय मुलांचे मूल्य संवर्धन, संस्कारक्षम तसेच सुशिक्षित आणि सुसंस्कृत नवसमाज घडविण्याचे उपक्रमाचा भाग असलेल्या ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमात पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न हायस्कूल मुलींचे आणि मुलांचे या दोन्ही प्रशालेत हरिनाम जयघोषात ज्ञानोबा माऊली तुकाराम, जय हरी माऊली, रामकृष्णहरी नामजयघोषात उपक्रमास सुरुवात करण्यात आली.
ओळख श्री ज्ञानेश्वरिची परिवाराचे वतीने पुण्यातील प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न हायस्कूल मुलींचे आणि मुलांचे या दोन्ही प्रशालेत ओळख श्री ज्ञानेश्वरीची हा शालेय मुलांमुलींचे साठी होत असलेला संस्कारक्षम उपक्रम सुरु करण्यात आला.
Nigdi: संत निरंकारी मिशनतर्फे रुपीनगर, निगडीत मोफत आरोग्य चिकित्सा शिबिर; ६०० नागरिकांना लाभ
Maval Crime News :शेतात काम करत असताना भावाला मारहाण

या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे, ओळख ज्ञानेश्वरी परिवारातील घटक, सदस्य, अध्यापक, लेखक वासुदेव महाराज शेवाळे, विश्वम्भर पाटील, अर्जुन मेदनकर, प्राजक्ता हरपळे, सुहास सावंत, मुख्याध्यापिका सीमा कुळधरण, उपमुख्याध्यापिका वंदना सौनोने, स्मिता पवार, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न हायस्कूल ( मुलींचे ) मुख्याध्यापिका माया नाईक, उपमुख्याध्यापिका उज्जवला मोरे, पर्यवेक्षिका वैशाली घोडके, संस्था समन्वयिका अनुप्रीती गाजरे यांचेसह शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
विशेष म्हणजे श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे पुण्यात विसावले आहेत.
या पालखी सोहळ्याचे काळात उपक्रमास प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात सुमारे १०० वर शाळा सहभागी झाल्या आहेत. पुण्यातील अधिकाधिक शाळांनी उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन श्री संत ज्ञानेश्वर महाराज चरित्र समितीचे अध्यक्ष प्रकाश काळे यांनी संवाद साधत संस्था चालकांसह शाळांना केले. तत्पूर्वी श्री संत प्रतिमा पूजन, श्री सरस्वती पूजन, ग्रंथ, संत साहित्याचे पूजन, दीप प्रज्वलन हरिनाम गजरात झाले. यावेळी प्रशालेस श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची प्रतिमा भेट देत आळंदी देवस्थान च्या वतीने देण्यात आलेले संत साहित्य प्रशालेस सुपूर्द करीत मुलांना हरिपाठाचे वाटप करण्यात आले.
पुण्यात संत श्री ज्ञानेश्वर माऊली आणि श्री संत तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे विसावले असल्याची आठवण करत श्रींचे संत साहित्य ज्ञानभेट दिल्याची भावना व्यक्त करीत प्रकाश काळे, वासुदेव महाराज शेवाळे यांनी मुला, मुलींशी संवाद साधत मंत्रमुग्ध करणा-या वाणीतून ओळख श्री ज्ञानेश्वरीची या उपक्रमाची माहिती देत हा उपक्रम सर्व दूर तसेच मुलांचे माध्यमातून घराघरांत पोहोचावा तसेच भारताची भावी पिढी सुशिक्षित, सुसंस्कृत आणि संस्कारक्षम घडावी यासाठी मुलांना योग्य वयात संस्काराचे धडे या उपक्रमाचे माध्यमातून दिले जात आहेत.
यातून मुलांची गुणवत्ता वाढून मुलांचे शिक्षणात लक्ष लागून त्यांनी एकाग्रता वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. वासुदेव महाराज शेवाळे यांनी संत साहित्यातील दाखले देत सर्वागीण व्यक्तिमत्व विकासासाठी त्यांनी मार्गदर्शन केले. रक्षा बंधना चे पार्श्वभूमीवर मुला- मुलींनी ज्ञानदेवांची ज्ञानभेट स्वीकारली. सर्व पुणे शहर श्री ज्ञानोबा – श्री तुकोबामय “वैष्णवा संगती सुख वाटे जीवा” याची अनुभूती पुणेकर घेत आहेत. हेच औचित्य साधून हरिपाठ व ओळख श्री ज्ञानेश्वरी या संस्कारक्षम उपक्रमाची सुरुवात पुण्यातील शाळांत होत असल्याचा यावेळी आनंद आणि समाधान व्यक्त करण्यात आले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न हायस्कूल ( मुलींचे ) आणि माॅडर्न हायस्कूल ( मुलांचे ) या दोन्ही शाळेतील मुलांना यावेळी संत साहित्य हरिपाठ हि ज्ञानभेट देण्यात आली. मुलांमुलींनी मोठ्या उत्साहात हि भेट स्वीकारत या शब्दरूपी मिठाईचा रोज आस्वाद घेणार असल्याचे सांगितले.
शाळेच्या मुख्याध्यापिका माया नाईक, उपमुख्याध्यापिका डॉ. उज्ज्वला मोरे, पर्यवेक्षिका वैशाली घोडके, संस्था समन्वयिका अनुप्रिती गाजरे उपक्रमास परिश्रम घेतले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, कार्यवाह शामकांत देशमुख, सहकार्यवाह ज्योत्स्ना एकबोटे, सह कार्यवाह डॉ. निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष पल्लवी जाधव, उद्धव खरे यांचेसह सर्व शाळा समिती सदस्य यांनी सर्व शिक्षिका, शाळेच्या पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापिका सीमा कुळधरण, उपमुख्याध्यापिका वंदना सौनोने, स्मिता पवार, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे माॅडर्न हायस्कूल ( मुलींचे ) मुख्याध्यापिका माया नाईक, उपमुख्याध्यापिका उज्जवला मोरे, पर्यवेक्षिका वैशाली घोडके, संस्था समन्वयिका अनुप्रीती गाजरे यांनी कार्यक्रमाचे यशस्वीतेस परिश्रम घेतले. सूत्रसंचालन माधवी चिटणीस यांनी केले. आभार सुधा पवार यांनी मानले.