Team My pune city –लोकमान्य टिळक यांच्या जयंतीनिमित्त(Pune) लोकमान्य स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने एक प्रेरणादायी आणि भावस्पर्शी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या विशेष प्रसंगी परसिस्टंट टेक्नॉलॉजीचे संस्थापक आनंदजी देशपांडे यांना लोकमान्य स्मृती पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून चित्रपट अभिनेत्री मृणाल कुलकर्णी,कुणाल टिळक, शैलेश टिळक, स्मिता गानू आणि लोकमान्य स्मृती प्रतिष्ठानचे अध्यक्ष आशिष जोशी यांची विशेष उपस्थिती होती. तसेच महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी देखील उपस्थित राहून आपले प्रेरणादायी विचार मांडले.
Tamhini Ghat murder : व्यसनाधीन भावानेच केला भावाचा खून
Talegaon Dabhade: कै. डॉ. जयंत नारळीकर स्मृती विज्ञान लेखन पुरस्कार सोहळा संपन्न
या कार्यक्रमाच्या निमित्ताने आशिष जोशी आणि त्यांच्या कार्यसमितीने गेली आठ वर्षे सातत्याने आणि समर्पणभावे राबवलेल्या सामाजिक उपक्रमांची प्रशंसा करण्यात आली. लोकमान्य टिळकांचे विचार समाजात रुजवण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे.
कार्यक्रमात रोहन जोशी, तपन इनामदार, परीक्षित कुलकर्णी, श्रीराम जोशी, अभिषेक देशपांडे आणि सुमेध बागायतकर या नवतरुणांनी घेतलेली सक्रिय भूमिका लक्षवेधी ठरली. त्यांचा उत्साह आणि सामाजिक बांधिलकी हीच लोकमान्यांच्या विचारांना खरी श्रद्धांजली आहे.
कुणाल टिळक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “या उपक्रमासाठी मी याआधीही या टीमच्या पाठीशी होतो आणि पुढेही राहणार आहे.” त्यांच्या या शब्दांनी सर्वांच्या मनात विश्वास आणि ऊर्जा निर्माण केली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी लोकमान्य स्मृती प्रतिष्ठानच्या सर्व पदाधिकारी, स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार!