situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

‌Pune: ‘अतुलनीय आशा‌’ : आशा भोसले यांना कलाकारांची स्वर-शिल्प भेट

Published On:

Team My Pune City –सुप्रसिद्ध सदाबहार गायिका आशा भोसले यांच्या 92व्या (Pune)वाढदिवसानिमित्त पुण्यातील कलाकारांनी आज त्यांना अनोखी स्वर-शिल्प भेट दिली.

आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे त्यांच्या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांच्या ‌‘अतुलनीय आशा‌’ या सांगितीक कार्यक्रमाचे सोमवारी (दि. 8) पूना गेस्ट हाऊस येथे आयोजन करण्यात आले होते. डॉ. वर्षा जांभेकर यांची प्रस्तुती असलेल्या या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेली गीते डॉ. जांभेकर यांच्यासह डॉ. माया माईणकर, हेमा कुलकर्णी, अनघा एकबोटे, मेधा सेनगावकर, शुभांगी पांचाळ, धनंजय इंगळे, योगेश वाघेला, उदय गाडगीळ, अतुल महाजन यांनी सादर केली.

‌‘वक्रतुंड महाकाय‌’ या गणेश वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. ‌‘रुपेरी वाळूत‌’, ‌‘रेशमाच्या रेघांनी‌’, ‌‘जीवन के हर मोड‌’, ‌‘आओ ना गले लगाओ ना‌’, ‌‘लेकर हम दिवाना दिल‌’, ‌‘ये मेरा दिल प्यारका दिवाना‌’, ‌‘ओ हसिना जुल्फोवाली‌’, ‌‘परदे मे रहने दो‌’, ‌‘जब छाये मेरा जादू‌’ अशी मंत्रमुग्ध करणारी तसेच बॉलिवुडचा सुवर्णकाळ दर्शविणारी अनेक सदाबहार गीते यावेळी सादर करण्यात आली. सर्व गायिकांनी एकत्रितपणे सादर केलेल्या ‌‘मौसम मस्ताना‌’ या गाण्याला रसिकांनी विशेष दाद देत सहगायनाचा आनंदही लुटला. आजच्या तरुणाईलाही भावणारी उडत्या चालींची तसेच रिमेक केलेली परंतु आजही मूळ स्वरूपात रसिकांच्या हृदयात असलेली गीते सादर करून कलाकारांनी रसिकांचे मन जिंकले. कार्यक्रमाची सांगता सर्व कलाकारांनी सादर केलेल्या ‌‘जयोस्तुते‌’ या गीताने करण्यात आली.

Pune traffic update : ईद-ए-मिलाद मिरवणुकीनिमित्त पुण्यात आज वाहतुकीत बदल

Bhagwan Shinde: विद्यार्थ्यांनी जुनी व नवीन अध्ययन पद्धती आत्मसात करून अभ्यास करावा- रो.भगवान शिंदे

कलाकारांच्या सादरीकरणाला भरभरून दाद देत रसिकांनी टाळ्या व शिट्यांच्या गजरात कलाकारांचे कौतुक करत अनेक गाण्यांसाठी वन्समोरची मागणी केली. दिलखेचक गीतांच्या स्वरवर्षावात रसिक चिंब होत असताना सुप्रसिद्ध शिल्पकार सुरेश राऊत यांनी आशा भोसले यांचे अप्रतिम शिल्प साकारत या थोर गायिकेला मानवंदना दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धनंजय इंगळे यांनी केले.

लीलाताई तुपे, प्रशांत तुपे, वैशाली तुपे, गायक निखिल हिरुलकर, निवृत्त आयजीपी चंद्रशेखर दैठणकर, भाजपा शहर चिटणीस प्रियांका शेंडगे-शिंदे, आनंद सराफ आदी मान्यवर आवर्जून उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी केले तर संयोजन अजित कुमठेकर यांचे होते.

Follow Us On