Team My Pune City –पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील वनाझ ते रामवाडी मार्गावर (Pune)छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणारा मुठा नदीवर बांधण्यात आलेल्या पादचारी पूलाचे आज दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झाले. हा पूल छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानकाला शनिवार पेठ, सदाशिव पेठ आणि नारायण पेठ यांसारख्या दाट लोकवस्तीच्या भागांशी जोडतो, ज्यामुळे परिसरातील नागरिकांना मेट्रो सेवा वापरणे अधिक सोयीचे होईल.
हा पूल एक आधुनिक ‘केबल स्टेड ब्रिज’ आहे, जो अभियांत्रिकी आणि कलेचा एक उत्कृष्ट संगम दर्शवतो. पुण्याच्या सांस्कृतिक परंपरेचा सन्मान करण्यासाठी या पुलाची रचना तानपुऱ्याच्या आकारासारखी करण्यात आली आहे. तांत्रिकदृष्ट्या हा पूल १७९.७९१ मीटर लांब आणि ८ मीटर रुंद आहे. यामध्ये ७२.२६९ मीटर उंचीचा एक खास ७०-डिग्री कललेला काँक्रीटचा पायलन वापरण्यात आला आहे, फक्त पादचाऱ्यांसाठी नदीवर बांधण्यात आलेला अशा प्रकारचा हा पुणे शहरातील पहिलाच पूल आहे.
Mahavitaran: विद्युत सहायकपदाच्या उमेदवारांना मूळ कागदपत्रे पडताळणीसाठी शेवटची संधी;महावितरणकडून ९ व १० सप्टेंबरला पडताळणी
Dilip Sonigara Jewellers:घरच्या बाप्पाच्या सजावटीला द्या नवे रुप – दिलीप सोनिगरा ज्वेलर्स कडून ५१ चांदीच्या फ्रेम्स जिंकण्याची संधी



या पुलामुळे मेट्रो प्रवाशांना थेट मेट्रो स्टेशनवर पोहोचता येईल. तसेच, हा पूल पुणे शहरातील पादचारी चळवळीला प्रोत्साहन देईल आणि लोकांना मेट्रो स्थानकात तसेच पुढे परस्पर जंगली महाराज रस्त्यापर्यंत चालत जाण्यासाठी एक सुरक्षित आणि सुंदर मार्ग उपलब्ध झाला आहे. पुणे मेट्रो टप्पा १ मध्ये पिंपरी चिंचवड मनपा ते स्वारगेट आणि वनाझ ते रामवाडी असे दोन मार्ग आहेत. या दोन्ही मार्गांवर दररोज ५५४ मेट्रो फेऱ्यांद्वारे दोन लाखांपेक्षा जास्त प्रवासी प्रवास करतात. या नवीन पुलामुळे शहराच्या मध्यवस्तीत दाट लोकवस्ती असणाऱ्या भागातील आणखी प्रवाशांना मेट्रोचा लाभ घेणे शक्य होणार आहे.
या उदघाट्न प्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, विधान परिषद उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे, राज्य मंत्री माधुरी मिसाळ, आमदार सिद्धार्थ शिरोळे, हेमंत रासने, सुनील कांबळे, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, संचालक अतुल गाडगीळ व विनोद कुमार अग्रवाल, अतिरिक्त महाव्यवस्थापक चंद्रशेखर तांबवेकर (प्रशासन व जनसंपर्क) आणि अन्य अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते.