situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Idol : भार्गव जाधव, अभितांश श्रीवास्तव, पियुष भोंडे ठरले ‘पुणे आयडॉल’

Published On:
Pune Idol
---Advertisement---

संगीत क्षेत्रात नवोदितांना मिळाले (Pune Idol) मानाचे व्यासपीठ

Team MyPuneCity – पुणे शहराच्या सांस्कृतिक वैभवाचा भाग ठरलेली पुणे आयडॉल (Pune Idol) ही संगीत स्पर्धा यंदाही उत्साहात पार पडली. लिटिल चॅम्प गटात भार्गव जाधव, युवा आयडॉल गटात अभितांश श्रीवास्तव आणि जनरल आयडॉल गटात पियुष भोंडे यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

सोमेश्वर फाऊंडेशन आयोजित या स्पर्धेत देशभरातील स्पर्धक सहभागी झाले होते. बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या महाअंतिम फेरीत विविध गटांतील एकूण १८ स्पर्धकांनी सादरीकरण करत परीक्षकांची मने जिंकली.

संगीत म्हणजे आनंदाचा एक मेळा. कोणतेही संगीत ऐकल्यावर लगेच आपल्या मनावर त्याचा परिणाम होतो. एक नवचैतन्य निर्माण होते. गाण्याचा छंद जोपासून अनेक पुणेकरांनी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटविला आहे. पुणेकरांच्या गायनाच्या छंदाला गेली 23 वर्ष सोमेश्वर फाऊंडेशनमार्फत सनी निम्हण प्रेरणा देत आहेत. याबद्दल समाधान आहे, अशी भावना राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी व्यक्त केली.

Police Transfers : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील ८०१ पोलीस अंमलदारांच्या पारदर्शक बदल्या

दिवंगत माजी आमदार विनायक निम्हण यांनी गायक कलाकारांना दिलेले मानाचे व्यासपीठ म्हणजे पुणे आयडॉल (Pune Idol) स्पर्धा. या स्पर्धेची महाअंतिम फेरी बालगंधर्व रंगमंदिरात पार पडली. यावेळी कृषिमंत्री कोकाटे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे आणि संयोजक सनी विनायक निम्हण उपस्थित होते.

पुणे आयडॉल स्पर्धेच्या निमित्ताने दरवर्षी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या व गायन कला जोपासणाऱ्या व्यक्तींचा ‘व्हाईस ऑफ चॉइस’ पुरस्काराने सन्मान केला जातो. यंदा डॉ. विनय थोरात, शिवानी पांढरे, नीलेश निकम, अॅड. शीतल कुलकर्णी यांना सन्मानित करण्यात आले.

पुणे आयडॉल (Pune Idol) चा सविस्तर निकाल:
🔹 लिटिल चॅम्प गट:
🥇 भार्गव जाधव
🥈 परी तेलंग

🔹 युवा आयडॉल गट:
🥇 अभितांश श्रीवास्तव
🥈 नीव कनानी

🔹 जनरल आयडॉल गट:
🥇 पियुष भोंडे
🥈 निखिल गर्गे

🔹 ओल्ड इज गोल्ड गट:
🥇 सुनील यादव
🥈 मनोज मोरे

Jyoti Malhotra : पाकिस्तानच्या ISI चे हेरगिरी मॉड्यूल भारतात कसे काम करते? हनी ट्रॅपचा पॅटर्न काय? 

कृषीमंत्री कोकाटे म्हणाले की, पुणे आयडॉलच्या (Pune Idol) माध्यमातून शहरातील नवोदित गायकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याची इच्छा दिवंगत आमदार विनायकराव निम्हण यांची होती. ती आजही सातत्याने पूर्ण होत आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले की, एखादा उपक्रम सुरू करणे सोपे असते. मात्र तो दीर्घकाळ सातत्याने आणि दिमाखात सुरू ठेवणे कठीण असते. पण सनी निम्हण यांनी तो वारसा यशस्वीरित्या पुढे नेला आहे.

सनी निम्हण यांनी प्रास्ताविक भाषणात सांगितले की, अंतिम फेरीसाठी एकूण ७२५ स्पर्धकांमधून १८ स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. पुणे आयडॉल (Pune Idol) ही केवळ स्पर्धा नसून कलाकारांसाठी एक प्रेरणादायी व्यासपीठ आहे.

स्पर्धेतील चारही गटांतील प्रथम क्रमांक विजेत्यांना १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देण्यात आले, तर द्वितीय क्रमांक विजेत्यांना १० हजार रुपये, स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र मिळाले.

कार्यक्रम व्यवस्थापन व परीक्षण

स्पर्धेचे परीक्षण राजेश दातार, जितेंद्र भुरुक आणि मंजुश्री ओक यांनी केले. सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी व महेश गायकवाड यांनी तर आभार प्रदर्शन उमेश वाघ यांनी केले. आयोजन यशस्वी होण्यासाठी अमित मुरकुटे, हेमंत कांबळे, अनिकेत कपोते, वनमाला कांबळे, संजय माजिरे, गणेश शेलार, संजय तरडे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Follow Us On