उद्या, दिनांक ९ जून २०२५ पासून मंडई स्थानकाचे प्रवेशद्वार क्र. ३ सुरू; रामवाडी आणि कासारवाडी स्थानकांवर सरकत्या जिन्यांची सुविधा
Team MyPuneCity –पुणे मेट्रो प्रकल्पाने पुणेकरांसाठी आणखी एक सुविधा उपलब्ध करून दिली आहे. उद्या, दिनांक ९ जून २०२५ पासून मंडई मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार क्रमांक ३ आता प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त, रामवाडी आणि कासारवाडी मेट्रो स्थानकांवरील प्रवेशद्वारांवर सरकते जिने (एस्केलेटर) सुरू करण्यात आले आहेत, ज्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.
मंडई मेट्रो स्थानक हे पुणे मेट्रो मधील एक अत्यंत महत्वाचे स्थानक आहे. पुणे शहराच्या मध्यवस्तीत हे स्थानक असल्याने हे अनेक मध्यवर्ती स्थळापासून अत्यंत जवळ आहे. पुण्यातील सर्वात मोठी भाजी मंडई, होलसेल मार्केट असणारी रविवार पेठ, तुळशीबाग, आणि अनेक पर्यटन व धार्मिक स्थळे मंडई मेट्रो स्थानकाच्या जवळ आहेत. नागरिकांना मध्यवस्तीत आणि पेठ भागांमध्ये येण्यासाठी हे मेट्रो स्थानक अत्यंत महत्वाचे आहे. मंडई मेट्रो स्थानकाचे नव्याने सुरू झालेले प्रवेशद्वार क्रमांक ३ महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ आहे. या प्रवेशद्वारामुळे प्रवाशांना खालील प्रमुख ठिकाणी पोहोचणे अत्यंत सोपे होणार आहे.
Pune : साहित्यिकाला सत्याचा, विवेकाचा धर्म असावा- डॉ. श्रीपाल सबनीस
- बाबुगेनू गणपती
- श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
- दत्त मंदिर
- तुळशीबाग
- तुळशीबाग राम मंदिर
- शनिपार
यामुळे धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देणाऱ्या पुणेकरांना आणि खरेदीसाठी तुळशीबाग या पुणेकरांच्या आवडत्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रामवाडी आणि कासारवाडी मेट्रो स्थानकांवर सरकत्या जिन्यांची (एस्केलेटर) सोय:
उद्या, दिनांक ९ जून २०२५ पासून रामवाडी मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक २ आणि कासारवाडी मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक ३ येथे आता सरकते जिने (एस्केलेटर) सुरू करण्यात आले आहेत.
या प्रवेशद्वारांतून स्थानकात ये-जा करण्यासाठी यापूर्वीच जिना आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध होती, परंतु आता सरकत्या जिन्यांमुळे प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि अधिक सामान असलेल्या व्यक्तींना अधिक सोयीचे होणार आहे.
पुणे मेट्रो प्रवाशांना उत्तम आणि आधुनिक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे. या नवीन सुविधांमुळे पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत नक्कीच वाढ होईल.