👉 यंदा मानाच्या पाच गणपतींचा विसर्जन सोहळा वेळेत पूर्ण”
Team My Pune City – पुण्यात आज, ६ सप्टेंबर २०२५ रोजी, (Pune Ganpati Visarjan 2025)अनंत चतुर्दशीच्या दिवशी पारंपरिक जल्लोष, भक्तीभाव आणि सांस्कृतिक वैभवाच्या वातावरणात मानाच्या पाच गणपतींसह श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतींचे विसर्जन पार पडले.
सकाळी ७:५३ वाजता मानाचा पहिला कसबा गणपतीची आरती प्रभात बँडच्या सुरांनी सुरू झाली. विसर्जनापूर्वी रंगीबेरंगी रांगोळ्यांनी मार्ग सजवला गेला. ७:५८ वाजता चांदीच्या पालखीत बाप्पा विराजमान झाले आणि मंडईकडे मार्गस्थ झाले. त्याचवेळी मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी शंखनादासह मिरवणुकीसाठी सज्ज झाला आणि ८:५० वाजता मंडईकडे रवाना झाला. ८:५१ वाजता मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपती फुलांनी सजलेल्या रथावरून मार्गस्थ झाला, तर ९:०१ वाजता मानाचा चौथा तुळशीबाग गणपती मिरवणुकीची तयारी सुरू झाली.
Bhaje Maval: श्री शिवाजी उदय मित्र मंडळ भाजे गणेशोत्सव मंडळाचा आकर्षक देखावा
Nana Peth Murder : असा होता खुनाचा घटनाक्रम, नाना पेठेत आज कडक बंदोबस्त
९:४२ वाजता कसबा गणपतीची मिरवणूक औपचारिकपणे सुरू झाली, ज्यात अजित पवार, चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांनी पालखीला खांदा दिला. ९:५२ वाजता मिरवणूक लक्ष्मी रस्त्यावर पोहोचली, जिथे ११ चौकात रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या आणि यंदाची थीम कचरा व्यवस्थापन होती. १०:०३ वाजता गुरुजी तालीम मंडळाची विसर्जन मिरवणूक गुलाल उधळणीसह सुरू झाली आणि १०:४० वाजता टिळक चौकातून बेलबाग चौकाकडे सरकली. ११:५३ वाजता गुरुजी तालीम बेलबाग चौकात दाखल झाला, तर ११:५४ वाजता कसबा गणपती अलका चौकात पोहोचण्याच्या तयारीत होता, जिथे राष्ट्रीय कला अकादमीने भव्य रांगोळी साकारली होती.
दुपारी १:३० वाजता मानाचा चौथा तुळशीबाग गणपती अडीचशे किलो चांदीच्या सजावटीसह रथावर विराजमान झाला आणि बेलबाग चौकात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत झाले. १:३७ वाजता मानाचा पाचवा केसरी वाडा गणपती बेलबाग चौकात दाखल झाला. २:४५ वाजता पाचवा मानाचा गणपती मार्गस्थ झाला, तर २:४६ वाजता कसबा गणपती अलका चौकातून विसर्जनासाठी निघाला.
दुपारनंतर विसर्जनाची गती वाढली. ३:४७ वाजता कसबा गणपती, ४:१० वाजता तांबडी जोगेश्वरी, ४:३५ वाजता गुरुजी तालीम आणि ४:५९ वाजता तुळशीबाग गणपतीचे विसर्जन पूर्ण झाले. ५:०१ वाजता दगडूशेठ हलवाई गणपती लक्ष्मी रोडवर दाखल झाला, तर तुळशीबाग बाप्पाचे विसर्जन घाटावर पूर्ण झाले. ५:०३ वाजता उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतः ढोल वाजवून मिरवणुकीत रंग भरला.
५:०४ वाजता पांचाळेश्वर घाटावर मानाच्या गणपतींचे विसर्जन सुरू झाले, पावसातही भक्तांची गर्दी कायम होती. ५:२३ वाजता कसबा आणि तांबडी जोगेश्वरी यांनी वेळ पाळल्याबद्दल पोलिसांकडून कौतुक झाले, तर ५:२७ वाजता केसरी वाडा गणपती अलका चौकात दाखल झाला आणि भक्तांनी भावूक निरोप दिला.
यंदा डीजे बंद असल्याने संपूर्ण मिरवणूक पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम, फुगड्या आणि नृत्यांच्या तालावर रंगली. रांगोळ्या, फुलांची सजावट आणि रोषणाईने पुण्याचे रस्ते उजळले होते. पावसातही भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता आणि “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”च्या जयघोषात बाप्पाला निरोप देण्यात आला.