Team My Pune City –कोंढवा परिसरात टोळक्याने तीक्ष्ण शस्त्रे उगारून दहशत माजवत दुकानांची (Pune)तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर परिसरात काही काळ भीतीचं वातावरण निर्माण झालं. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत तिघा तरुणांना अटक केली असून, त्यांच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे हामजा खान (वय २०), फिदा खान (वय २०) आणि शाहरूख शेख (वय १८, सर्व रा. कोंढवा परिसर) अशी आहेत.
याप्रकरणी समीर मोहम्मद युसुफ शेख (वय ४७, रा. मीठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Pune : लक्ष्मीपूजनाच्या रात्रीच चोरी! पूजेत ठेवलेले १९ लाख ८८ हजारांचे दागिने व रोकड लंपास
Nakul Bhoir Murder : घरगुती कलहातून सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांचा पत्नीने केला खून
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी समीर शेख यांचे मीठानगर परिसरात दुकान आहे. दिनांक २० ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास, आरोपी आणि त्यांचे साथीदार या भागात आले. त्यांनी हातातील तीक्ष्ण शस्त्रे उगारून परिसरात दहशत माजवली.
या दरम्यान, आरोपींनी अनेक दुकानांच्या दरवाजांवर लाथा मारल्या, एका चिकन विक्री दुकानाचा एलईडी फलक फोडला, तसेच एका भंगार दुकानाबाहेर ठेवलेला टीव्ही तोडफोड केला.
अचानक घडलेल्या या प्रकारामुळे परिसरातील नागरिक आणि व्यापारी घाबरून गेले. अनेकांनी आपली दुकाने तातडीने बंद केली. घटनेनंतर आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाले होते; मात्र पोलिसांनी त्यांचा शोध घेऊन तिघांना अटक केली.
या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक खराडे करीत आहेत. पोलिसांनी उर्वरित आरोपींचा शोध सुरू केला असून, या घटनेमुळे कोंढवा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.


















