Team My Pune City – गणेशोत्सवानिमित्त महापालिकेकडून ( Pune Ganeshotsav) उपलब्ध करून देण्यात आलेल्या कृत्रिम हौद, लोखंडी टाक्या आणि मूर्तिदान केंद्रांचा उपयोग करून दीड दिवसांच्या अवघ्या 2 हजार 100 गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. विसर्जनासोबतच दोन हजार किलो निर्माल्य वेगळे गोळा करण्यात आले असून, पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचा संकल्प यशस्वीपणे पुढे नेल्याची माहिती घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
Dehuroad Crime News : गृहनिर्माण संस्थेची फसवणूक, बिल्डरसह नऊ जणांवर गुन्हा
महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ( Pune Ganeshotsav) यंदा 38 कृत्रिम हौद, 648 लोखंडी टाक्या, 338 ठिकाणी निर्माल्य कलश व 241 मूर्तिदान केंद्रे उभारण्यात आली होती. या माध्यमातून नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत घरगुती गणेशमूर्ती विसर्जित केल्या. गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत शहरातील प्रमुख घाटांवर 2 हजार 100 मूर्ती विसर्जनासाठी आणण्यात आल्या. यामध्ये 420 मूर्ती कृत्रिम हौदात, 1500 मूर्ती लोखंडी टाक्यांमध्ये तर 216 मूर्ती थेट मूर्तिदान केंद्रांत जमा झाल्या.
दरम्यान, विसर्जनावेळी नदी-ओढ्याचे पाणी प्रदूषित होऊ नये यासाठी ( Pune Ganeshotsav) महापालिकेने विशेष खबरदारी घेतली होती. प्रमुख 15 विसर्जन घाटांवर अग्निशमन दल, महापालिकेचे सेवक आणि जीवरक्षक 24 तास तैनात ठेवले होते. त्याचबरोबर गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्ताचीही काटेकोर व्यवस्था करण्यात आली.
Pune: ‘तूच माझा फ्रेंड आहेस बाप्पा.. मोरया’ गीताचे खासदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते अनावरण
निर्माल्य संकलन मोहिमेत ही नागरिकांचा उत्स्फूर्त ( Pune Ganeshotsav) सहभाग दिसून आला. विविध घाटांवर ठेवलेल्या कलशांमधून तब्बल दोन हजार किलो निर्माल्य जमा करण्यात आले असून, यातील सर्वाधिक 380 किलो निर्माल्य कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयातून गोळा झाल्याची नोंद झाली आहे.
महापालिकेच्या या उपक्रमामुळे पुण्यातील गणेशोत्सव अधिक पर्यावरणपूरक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पडत असल्याचे स्पष्ट झाले ( Pune Ganeshotsav) आहे.