Team My Pune City – “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या” या जयघोषात पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 32 तास 26 मिनिटे ( Pune Ganesh Visarjan 2025 ) चालली. पुण्यातील गणेशोत्सवाची आगमन व विसर्जन मिरवणूक ही राज्यभरातून लक्षवेधी ठरते. यंदाही लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोड या प्रमुख मार्गांवर विसर्जन सोहळा पाहण्यासाठी हजारो नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती.
Rashi Bhavishya 8 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
काल (रविवारी) सकाळी 9.30 वाजता महात्मा फुले मंडई येथून मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची मिरवणूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Pune Ganesh Visarjan 2025 )यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरू करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी 5.40वाजेपर्यंत मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन पार पडले. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन रात्री 9.25 वाजता संपन्न झाले.
रात्री उशिरा लक्ष्मी रोड, टिळक रोड, कुमठेकर रोड आणि केळकर रोडवर डीजे मिरवणुका थांबल्या होत्या. सकाळी 6 वाजता या मार्गांवरील मिरवणुका पुन्हा सुरू झाल्यानंतर वातावरण अधिकच उत्साहपूर्ण झाले. पहाटेपासून नागरिकांनी विसर्जन पाहण्यासाठी मोठी गर्दी ( Pune Ganesh Visarjan 2025 ) केली.
सकाळी साडेपाच वाजेपर्यंत अलका टॉकीज चौकातून सर्व मिरवणुका डेक्कन येथील विसर्जन घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या. अखेरीस सकाळी 6 वाजता( Pune Ganesh Visarjan 2025 ) शेवटच्या मंडळाचे विसर्जन पार पडले. अशा प्रकारे यंदाची विसर्जन मिरवणूक विक्रमी वेळ घेत पूर्ण झाली.
याबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, “गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी प्रत्येक विभागनिहाय गणेश मंडळांच्या बैठका घेऊन कार्यकर्त्यांसोबत संवाद साधला. त्यामुळे विसर्जन मिरवणूक ( Pune Ganesh Visarjan 2025 ) शिस्तबद्ध आणि शांततेत पार पडली. मात्र, काही मंडळांनी मध्ये अंतर ठेवले तसेच काही ठिकाणी अनपेक्षित घटना घडल्यामुळे मिरवणुकीचा कालावधी वाढला,” अशी कबुली त्यांनी दिली.
पुण्यातील विसर्जन मिरवणूक विक्रमी 32 तास 26 मिनिटे चालल्यामुळे ( Pune Ganesh Visarjan 2025 ) या ऐतिहासिक सोहळ्याची यंदाची नोंद विशेष ठरली आहे.