Team My Pune City – शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर (Pune )ऑनलाईन फसवणुकीची घटना घडली आहे. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, फिर्यादी यांची तब्बल 19 लाख 57 हजार 610 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली आहे.
ही घटना दि. 9 मे ते दि. 29 मे 2025 या कालावधीत घडली. फिर्यादी यांना मोबाईलवरून व ऑनलाईन माध्यमातून संपर्क साधण्यात आला. विविध मोबाईल धारक व बँक खाते धारक वापर कर्त्यांनी त्यांचा विश्वास संपादन करून त्यांना लोन मिळवून देण्याचे आमिष दाखवले. “लोन प्रक्रिया सुरू आहे”, “तुम्हाला लगेच पैसे मिळतील” अशा बहाण्याने वेळोवेळी विविध बँक खात्यांवर पैसे पाठवण्यास भाग पाडले.
Sunil Shelke: मावळातील चार ग्रामपंचायतींना नवीन कार्यालयांसाठी ८५ लाखांचा निधी; आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश
Power Supply : वाहिन्यांवरील तांत्रिक देखभालीचे कामामुळे आज व उद्या; लोणावळा परिसरात वीजपुरवठा चक्राकार पद्धतीने राहणार बंद
काही दिवसांनी त्यांनी फिर्यादीचा संपर्क तोडला. त्यावेळी स्वतःची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तातडीने पोलिसात धाव घेऊन तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.