Team My Pune City – पुण्यातील गुरुवार पेठेतील( Pune Fire News) झेबा शेल्टर्स सोसायटीत बुधवारी (दि. 3 सप्टेंबर) पहाटे साडेतीनच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. तळमजल्यावर असलेल्या वीज मीटर आणि दुचाकींना लागलेल्या आगीमुळे काही क्षणातच परिसरात दाट धूर पसरला. यामुळे संपूर्ण सोसायटीत भीतीचे वातावरण निर्माण झाले.
Lonavala Crime News : लोणावळा शहरात अल्पवयीन मुलावर 18 वर्षीय तरुणाकडून बलात्कार
अचानक पेटलेल्या आगीमुळे घाबरलेल्या रहिवाशांनी ( Pune Fire News)तत्काळ अग्निशमन दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. मिळालेल्या माहितीनुसार, जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पाण्याचा मारा करीत अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र दरम्यान, धुरामुळे रहिवाशांना श्वसनाचा त्रास होण्याची शक्यता असल्याने अग्निशमन दलाने धाडसी पाऊल उचलत सोसायटीतील तब्बल 46रहिवाशांना सुरक्षित बाहेर काढले.
Devendra Fadnavis : मी प्रत्येक समाजासाठी काम करत राहील-देवेंद्र फडणवीस
सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तथापि, दुचाकी व वीज मीटर जळून नुकसान झाले आहे. आगीचे नेमके कारण ( Pune Fire News)समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या कारवाईत अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवान अतुल मोहिते, अजिम शेख, सुधीर नवले, तेजस पटेल, सागर शिर्के आणि यश वीरकर यांनी सहभाग घेतला. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. घटनेची माहिती मिळताच खडक पोलिसांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी ( Pune Fire News) केली.