मोहक पक्षी आणि दुर्मिळ वन्यजीवांची सुंदर छायाचित्रे
Team My Pune City –भारताच्या कानाकोपऱ्यात भ्रमंती करून डॉ. पूनम शहा यांनी (Pune)आपल्या कॅमेऱ्यातून टिपलेल्या अनेक दुर्मिळ आणि मोहक पक्षी आणि वन्यजीवांच्या छायाचित्रांचे ‘फेटरएन्टेल’ प्रदर्शन पक्षी आणि निसर्गप्रेमींसाठी आजपासून खुले झाले आहे. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत महिलेने वन्यजीव विषयक छायाचित्रांचे भरविलेले एकल (सोलो) प्रदर्शन आहे.
कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण कलादालनात हे प्रदर्शन भरविण्यात आले असून प्रदर्शनाचे उद्घाटन आज (दि. 31) माजी प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांच्या हस्ते झाले. प्रदर्शन दि. 2 नोव्हेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळात सर्वांसाठी खुले आहे.

Rohit Arya : पवईत थरार : १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिस एन्काऊंट
Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
डॉ. पूनम शहा या वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असून गेल्या 12 वर्षांपासून वाइल्ड लाइफ फोटोग्राफी करीत आहेत. फोटोग्राफीच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण भारतात भ्रमंती केली असून भारतीय उपखंडातील 950 पेक्षा जास्त पक्ष्यांचे छायाचित्रण केले आहे. या प्रदर्शनात निवडक 140 छायाचित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत. सरडे, साप, बेडूक यांच्यासह स्नो लेपर्ड, काबिनीचा ब्लॅकी तसेच हिमाचल, स्पिती, उत्तर पूर्व भारतातील अनेक दुर्मिळ आणि सुंदर पक्षी या प्रदर्शन पाहता येणार आहेत.
प्रदर्शनाविषयी डॉ. पूनम शहा म्हणाल्या, वैद्यकीय व्यवसात असले तरी एखादी कला जोपासावी या हेतूने छायाचित्रण करण्यास सुरुवात केली. निसर्गात भटकंती करून स्वत: काढलेल्या छायाचित्रांचे प्रदर्शन भरवावे हे अनेक वर्षांचे स्वप्न होते. सुधीर हसमनीस यांच्या पुढाकारातून हे स्वप्न पूर्ण झाले आहे.
सुनील लिमये म्हणाले, वाइल्ड लाइफ फोटोग्राफीमध्ये महिलांचे प्रमाण फारच कमी आहे. डॉ. पूनम शहा यांनी काढलेली छायाचित्रे खूपच सुंदर व प्रभावी असून प्रदर्शनाच्या माध्यमातून एक वेगळा अनुभव घेता येणार आहे. कलात्मक फोटोग्राफी करण्यासाठी उपकरणे जशी चांगली लागतात त्याचप्रमाणे पुरेसा वेळ आणि पेशन्सही लागतात.
प्रसिद्ध निसर्ग छायाचित्रकार सुधीर हसमनीस यांनी प्रास्ताविक केले. आभार गायत्री हसबनीस पिंपळे यांनी मानले.
नोटीस मिळाली; सिंहिणीला पिल्ले झाली, जबाबदार कोण?
नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी भटकंती झाली पण कॅमेरा घेऊन स्वत: फोटो काढले नाही याची खंत वाटते. असे सांगून सुनील लिमये पुढे म्हणाले, बंदीस्त असलेल्या झूमधील प्राणांना पिल्ले होऊ देत नाही. कारण त्यांच्या पिल्लांवरही बंदीस्त राहण्याची वेळ येते. असा नियम अन्यायकारक वाटल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील सिंह-सिंहिणीला एकत्र येऊ देण्यासाठी मोकळे साडले. काही दिवसानंतर सिंहिणीला पिल्ले होणार असल्याचे समजले. यथाअवकाश तिला तीन पिल्ले झाली. त्यात दोन नर आणि एक मादी होते. ही माहिती समजल्यानंतर पिल्ले पाहण्यासाठी प्राणी संग्रहालयात पर्यटकांची संख्याही वाढली होती.


















