Team My Pune City –उत्तर भारतीयांच्या छटपूजेसाठी खडकवासला धरणातून जादा पाणी (Pune)सोडावे,अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ,माजी आमदार मोहन जोशी यांनी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे आज रविवारी केली.
उत्तर भारतीय लोकांमध्ये छटपूजेला अनन्य साधारण महत्व असते.येत्या दि. २७ आणि २८ रोजी छटपूजा आहे.नदी किंवा कालव्याकाठी जमून सूर्याला अर्घ्य दिले जाते.पुण्यात उत्तर भारतीय मोठ्या प्रमाणात आहेत.हडपसर,वानवडी, औंध,बालेवाडी अशा ठिकाणी नदी किंवा कालवा यासाठी जमून अर्ध्य दिले जाते.
Crime News: एस.टी. बस प्रवाशांचे पाकीट, पर्स चोरणार्या 3 महिला जेरबंद
Talegaon Dabhade: तळेगावातील सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न!
याकरिता कालव्यात पाणी सोडणे गरजेचे आहे.हे लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री विखे पाटील यांच्याशी संपर्क साधला आणि खडकवासला धरणातून कालव्यात दोन दिवसांकरिता पाणी जादा सोडावे अशी मागणी केली. मंत्री महोदयांनी मागणी मंजूर केली.त्यानुसार आता छटपूजेसाठी पाणी उपलब्ध राहील,असे मोहन जोशी यांनी सांगितले.


















