Team My Pune City – भारतीय हवामान विभागाच्या (Pune)मुंबई वेधशाळेकडून सोमवारी दुपारी पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागांसाठी पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज (सोमवारी) दुपारी १ वाजता प्रसिद्ध झालेल्या नाऊकास्ट बुलेटिननुसार पुढील तीन तासांमध्ये पुणे घाट परिसरात हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून परतीच्या टप्प्यात साधारणपणे स्थानिक पातळीवर गडगडाटासह सरी कोसळण्याची शक्यता अधिक असते. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील काही भागात आज दुपारनंतर पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
Pune: सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करत चित्रपट निर्मिती करा – गश्मीर महाजनी
Yugendra Pawar: तुतारी घराघरात पोहोचवा – युगेंद्र पवार
नागरिकांना अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच पावसाच्या सरींमध्ये सावधगिरी बाळगण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. घाटमाथ्याच्या भागांमध्ये जोरदार पावसामुळे दृष्यमानता कमी होणे, रस्त्यांवर पाणी साचणे किंवा वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वाहनचालक आणि प्रवासी यांनी विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच डोंगराळ परिसरातील स्थानिक प्रशासनालाही सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हवामान विभागाच्या सूचनांनुसार पुढील काही तासांसाठी पावसाचा अंदाज कायम राहणार असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.