Team MyPuneCity -पुणे शहरातील भावे हायस्कूल समोरील रस्त्यावर मद्यधुंद चार चाकी गाडीच्या चालकाने 12 जणांना उडवल्याची घटना घडली आहे.या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. आरोपी जयराम मुळे वय 27 रा. बिबवेवाडी यास अटक करण्यात आली आहे.
विश्रांतबाग पोलीस स्टेशनच्या वरीष्ठ निरीक्षक विजयमाला पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार,भावे हायस्कूल परिसरात स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासिका मोठ्या प्रमाणावर आहेत.तर भावे हायस्कूल समोरील रोडवर एक चहाची टपरी आहे.त्या ठिकाणी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि अन्य नागरिक चहा पीत होते.त्याचवेळी एमएच 13 ई पी 0354 या क्रमांकाच्या चार चाकी गाडीने तब्बल 12 जणांना उडविल्याची घटना घडली आहे.या घटने 6 स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आणि अन्य 6 असे एकूण 12 जण या घटनेमध्ये जखमी झाल्याची घटना घडली आहे.या घटनेतील जखमींना जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तसेच या प्रकरणातील आरोपी चालक जयराम शिवाजी मुळे यास ताब्यात घेण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. तसेच आरोपी चालकाने गाडी मद्यधुंद अवस्थेत गाडी चालविल्याचे प्राथमिक दृष्टीया दिसून येत आहे.आरोपी जयराम मुळे याची देखील गाडी नसून त्याच्या मित्राची गाडी आहे.तर गाडी मालकास देखील चौकशी करीत बोलविण्यात आले आहे.तर आरोपीकडे चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले