डॉ. रघुनाथ माशेलकर, वैशाली माशेलकर यांची प्रमुख उपस्थिती
Team My Pune City –आडकर फौंडेशनतर्फे ज्येष्ठ लेखक, दिग्दर्शक, (Pune)रंगकर्मी अशोक समेळ लिखित ‘द्रौपदी काल..आज..उद्या’ या द्रौपदीची विविध रूपे उलगडणाऱ्या कादंबरीचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
Maharashtra: राज्यातील 247 नगरपरिषदा आणि 147 नगर पंचायतींच्या नगराध्यक्ष पदांची आरक्षण सोडत जाहीर

कार्यक्रम रविवार, दि. 12 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी 5:30 वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सभागृहात होणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन वैशाली माशेलकर यांच्या हस्ते होणार असून अध्यक्षस्थानी पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर असणार आहेत. ज्येष्ठ रंगकर्मी संजीवनी समेळ, अंमळनेरच्या मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी, प्रसिद्ध अभिनेते संग्राम समेळ यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती आडकर फौंडेशनचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. डिंपल पब्लिकेशनतर्फे कादंबरी प्रकाशित करण्यात येत आहे. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात ‘द्रौपदी काल..आज..उद्या’ कादंबरीतील काही भागांचे अभिवाचन होणार आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.