situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: नाट्यकलेतून आदर्शवत माणूस घडतो – श्रीयोगी मुंगी

Published On:

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित नाट्यछटा स्पर्धेचे पारितोषिक वितरण

Team My pune city –नाट्यकलेद्वारे माणूस केवळ शिकत नाही तर(Pune)चांगला, आदर्शवत माणूस म्हणूनही घडतो. नाट्यकलेचे संस्कार बालवयापासूनच होत आहेत ही आनंदाची, अभिमानाची गोष्ट आहे, असे मत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यावाणीचे कार्यक्रम अधिकारी श्रीयोगी मुंगी यांनी व्यक्त केले.

नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित 34व्या दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ सदाशिव पेठेतील उद्यान प्रसाद सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी श्रीयोगी मुंगी बोलत होते. स्पर्धेचे पारितोषिक वितरण ज्येष्ठ कवयित्री संजीवनी बोकील यांच्या हस्ते झाले.

संजीवनी बोकील यांनी स्पर्धकांना गोष्टीरुपी मार्गदर्शन केले. शूरसेनची गोष्ट सांगून निसर्गातील पाने फुले वेली, फळे आणि बागा कशाप्रकारे मानवी जीवन सुंदर करण्यासाठी मानवाला मदत करतात हे सांगितले. आपल्या आजूबाजूचे वातावरण कितीही प्रदूषित झाले असले तरी आपले मन स्वच्छ आणि निर्मळ असावे, असेही त्या म्हणाल्या.

प्रास्ताविकात नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी म्हणाले, सहाशेपेक्षा जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाची सुरुवात पूजा पारखी आणि दिप्ती असवडेकर यांच्या नाट्यसंस्कार गीताने झाली. दिपाली निरगुडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रतीक पारखी, पूजा पारखी, अनुराधा कुलकर्णी, आशिष तिखे, दिप्ती असवडेकर, राधिका देशपांडे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले. विश्वस्त संध्या कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर अपूर्वा तिखे यांनी आभार मानले.

लेखन स्पर्धेतील विजेत्या नाट्यछटांचा संग्रह असलेल्या ‌‘सुमन नाट्यछटा‌’ आणि संध्या कुलकर्णी लिखित ‌‘सप्तरंगी नाट्यछटा‌’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन या प्रसंगी झाले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल :

गट क्र. 1 (शिशुगट) : प्रथम -प्रज्वल जोशी, द्वितीय – नित्या चोपडे, तृतीय – मिहित मठपती, उत्तेजनार्थ – विराट गोटे.

Atharvashirsha : नृत्य-गायनातून साकारले अथर्वशीर्ष

Talegaon Dabhade: तळेगाव दाभाडे MIDC परिसरातील जोडरस्त्याच्या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक; उद्या नवलाख उंब्रेच्या भैरवनाथ मंदिरात सभा

गट क्र. 2 (पहिली-दुसरी) : प्रथम – आदित्य कुलकर्णी, द्वितीय – शौनक मेस्त्री, तृतीय – मीरा अडकर, उत्तेजनार्थ – अमायरा जाधव, अनिश रिसबूड.

गट क्र. 3 (तिसरी-चौथी) : प्रथम – गार्गी वैद्य, द्वितीय – शिवंश मोरे, तृतीय – आनिका लहुरीकर, उत्तेजनार्थ – राघव घाटणेकर, पार्थ ठोंबरे.

गट क्र. 4 (पाचवी-सातवी) : प्रथम – स्पर्श कलवनकर, द्वितीय – नील देशपांडे, तृतीय – आरोही उंडे, उत्तेजनार्थ – राही पोहनेरकर, सन्विता कुलकर्णी.

गट क्र. 5 (आठवी-दहावी) : प्रथम – अर्चीस थत्ते, द्वितीय – इरा जोशी, तृतीय – सई भोसले, उत्तेजनार्थ – सनत देशपांडे, कैवल्य चांदवले.

गट क्र. 6 (खुला) : प्रथम – निकिता वाणी, द्वितीय – हर्षदा कुलकर्णी, तृतीय – सोमनाथ भवर, उत्तेजनार्थ – अश्विनी आठवले, सचिन काळे.

Follow Us On