Team Pune City –महाराष्ट्रीय कलोपासक (Pune)आयोजित हीरक महोत्सवी पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेला आज (दि. 10 ऑगस्ट) जल्लोषात सुरुवात झाली.
भरत नाट्य मंदिर येथे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दि. 24 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे.
सकाळच्या सत्रात ‘सत्यं शोधं सुंदरम्’ (अखिल भारतीय मराठा शिक्षण परिषदेचे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च), ‘मॅरेज ॲकॅडमी..’ (पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, आकुर्डी), ‘वर्दी’ (एन. बी. पी. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट कॅम्पस, आंबेगाव) तर सायंकाळच्या सत्रात ‘झेप’ (गरवारे वाणिज्य महाविद्यालय स्वायत्त), ‘मोक्ष कॅफे’ (अजिंक्य डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय), ‘द स्मेल’ (इंदिरा कॉलेज ऑफ कॉमर्स अँड सायन्स) या एकांकिकांचे सादरीकरण झाले.
Pune: पुणे ते कोकण रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी कोकण विकास महासंघाचा मागणीपत्र सादर
Golden Rotary: गोल्डन रोटरीचा आगळावेगळा रक्षाबंधन उत्सव

सोमवार, दि. 11 ऑगस्ट रोजी सादर होणाऱ्या एकांकिका
वेळ : सायंकाळी 5 वाजता
‘इन बिटवीन ऑफ’ (बृहन महाराष्ट्र महाविद्यालय), ‘व्हिक्टोरिया’ (डी. ई. एस. पुणे युनिव्हर्सिटी, शिवाजीनगर), ‘मृगजळ’ (टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, स्वायत्त)
संस्था आणि स्पर्धेचा चित्रमय इतिहास..
महाराष्ट्रीय कलोपासकचे 90वे वर्ष आणि पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा हीरक महोत्सव यानिमित्त भरत नाट्य मंदिराच्या आवारात संस्था आणि स्पर्धेचा ‘मागे वळून पाहताना’ हा चित्रमय इतिहास मांडण्यात आला आहे. तसेच सेल्फी पाँईटही करण्यात आला आहे. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत यश मिळविलेल्या संघांची नावेही येथे झळकत आहेत.