Team My Pune City – किरकोळ वादातून एका(Pune Crime News) 19 वर्षीय तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना एनडीए रस्त्यावरील उत्तमनगर परिसरात घडली. या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रथमेश चिंटू आढळ (वय १९, रा. साई निवास, कोंढेवे-धावडे, एनडीए रस्ता) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. या हल्ल्याप्रकरणी करणसिंह गचंड आणि अमनसिंह गचंड यांना अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (दि. ११ सप्टेंबर) रात्री आठच्या सुमारास प्रथमेश आढळ उत्तमनगर परिसरातून जात असताना आरोपींनी त्याला अडवले. “तू आम्हाला का भेटत नाहीस?” अशी विचारणा करून आरोपींनी शिवीगाळ सुरू केली. त्यानंतर त्यांनी तीक्ष्ण शस्त्र काढून प्रथमेशवर वार केला. हल्ल्यानंतर आरोपींनी परिसरात शस्त्रे उगारून दहशत माजविली व “आम्ही या भागातील भाई आहोत, आमच्या नादाला लागू नकोस” असा दम दिला.
Pune : सराईत चोरट्याला मालमत्ता गुणविरोधी पथकाकडून अटक;साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त
Talegaon Dabhade: नगरपालिकेच्या शाळांमध्ये डिजिटल शिक्षणाचा नवा अध्याय सुरू;गोल्डन रोटरीचा अभिनव उपक्रम
या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना बेड्या ठोकल्या असून पसार साथीदारांचा शोध सुरु आहे. या प्रकरणी उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस उपनिरीक्षक बिनवडे पुढील तपास करत आहेत.





















