Team My Pune City – सिंहगड रस्त्यावरील माणिकबाग ( Pune Crime News) परिसरात ७१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची बतावणी करून ७८ हजार रुपयांची सोन्याची अंगठी चोरट्याने लांबवल्याची घटना घडली आहे. हिंगणे खुर्द येथे राहणारे हे ज्येष्ठ नागरिक सोमवारी सकाळी माणिकबाग परिसरातून जात असताना एका चोरट्याने त्यांना अडवले.
Bhandarkar Institute : भांडारकर संस्थेला “ज्ञान-भारतम्” मिशनमध्ये क्लस्टर सेंटरचा मान
त्याने नातेवाईकांच्या निधनाचा बहाणा करत मंदिरात दान देण्यासाठी मदत मागितली आणि पूजा साहित्याची पिशवी दिली. त्यानंतर परिसरात चोरीच्या घटना घडत असल्याचे सांगून अंगठी काढून पिशवीत ठेवण्यास भाग पाडले. संभाषणात गुंतवून चोरट्याने अंगठी लांबवली ( Pune Crime News) आणि पसार झाला.
या प्रकरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस हवालदार उत्तम तारु तपास करत आहेत. शहरात गेल्या काही दिवसांपासून ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. चोरटे कधी पोलीस असल्याचे सांगतात, तर कधी मोफत धान्य किंवा साडीवाटपाचा बहाणा करून दागिने व रोकड ( Pune Crime News) लांबवतात.
Talegaon Dabhade News : अविस्मरणीय अनुभूती देणाराएक आगळावेगळा उपक्रम!;रोटरी सिटीचा गेट टुगेदर!
नुकतेच बाणेर परिसरात एटीएममधून पैसे काढणाऱ्या परप्रांतीय कामगारांना पोलीस असल्याचे सांगून लुटणाऱ्या सराईत गुन्हेगार श्रीराम विकास हानवतेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्यावर कोंढवा आणि निगडी पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी नागरिकांना अशा बतावणी करणाऱ्या चोरट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले असून, संशयास्पद व्यक्ती दिसल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा ११२ या नियंत्रण कक्ष क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले ( Pune Crime News) आहे.





















