Team My Pune City – शाळकरी मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका शाळेतील क्रीडा शिक्षकाला चंदननगर पोलिसांनी अटक केली. मंगेश बोराटे (वय ४०, रा. चंदननगर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत शाळकरी मुलीच्या आईने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. बोराटे याच्याविरुद्ध विनयभंग, तसेच बालकांचे लैंगिक अत्याचाारांपासून संरक्षण कायद्यातील कलमांन्वये (पोक्सो) गुन्हा दाखल ( Pune Crime News ) करण्यात आला आहे.
School Bus : विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याचे आवाहन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 वर्षीय पीडित मुलगी चंदननगर भागातील एका शाळेत आहे.
Water Closure Notice : तांत्रिक बिघाडामुळे तळेगाव दाभाडे शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत
आरोपी बोराटे हा क्रीडा शिक्षक आहे. ‘मुलींनी चांगला व्यायाम केला तर त्यांच्याकडे मुले बघतील. तुला मित्र आहे का?, तसेच मुली हसल्यानंतर मुलांची धडकन वाढते’, असे पीडित मुलीला बोराटे म्हणाला होता. वर्गात असे प्रश्न विचारल्याने मुलीच्या मनात लज्जा निर्माण झाली, असे मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. आईने पोलिसांकडे याबाबत तक्रार दिल्यानंतर बोराटे याला अटक करण्यात आली. चंदननगर पोलीस पुढील तपास करत ( Pune Crime News ) आहेत.