Team My pune city – पुणे शहरातील येरवडा भागात 40 दिवसाच्या मुलीला आई वडिलांनी साडेतीन लाख रुपयांत विक्री केल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी येरवडा पोलिसांनी आई वडिलांसह सहा जणांना अटक ( Pune Crime News ) केली आहे.
Pavana Dam : पवना धरणातून 400 क्युसेक्स विसर्ग सुरू; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
मीनल ओंकार सपकाळ (वय 30, रा. बिबवेवाडी)ओंकार औदुंबर सपकाळ (वय 29, रा. बिबवेवाडी),दीपाली विकास फटांगरे (वय 32, रा. संगमनेर),साहिल अफजल बागवान (वय 27, रा. सातारा), रेश्मा शंकर पानसरे (वय 34, रा. येरवडा) आणि सचिन रामा अवताडे (वय 44, रा. येरवडा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नाव ( Pune Crime News ) आहेत.
Hinjawadi Crime News : हिंजवडीत नाल्याचा प्रवाह बदलून अनधिकृत बांधकाम
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी आई मीनल सपकाळ ही पहिल्या पतीपासून वेगळी राहत आहे.तिला पाच वर्षांचा मुलगा आहे.तर सध्या ती ओंकार सपकाळ याच्यासोबत राहत आहे. 25 जून 2025 रोजी मीनल सपकाळ यांची प्रसृत झाल्यानंतर दीपाली फटांगरे यांना साडे तीन लाखात विक्री करण्याचे ठरले,तर मुलीला विक्री करण्याच्या व्यवहारात साहिल अफजल बागवान, रेश्मा शंकर पानसरे,सचिन रामा अवताडे यांनी मदत केली.
या व्यवहारात मध्यस्थांनी दोन लाख रुपये मीनल सपकाळ यांना दिले.ठरलेल्या रकमे पेक्षा कमी पैसे मिळाले आणि दिपाली फटांगरे यांनी मध्यस्थांना अधिक रक्कम दिली असावी,असा संशय मीनल सपकाळ यांना आला.यावरुन त्यांच्यामध्ये वाद झाल्याची घटना ( Pune Crime News ) घडली.
त्यानंतर माझी मुलगी पळवून नेल्याची तक्रार मीनल सपकाळ यांनी आमच्याकडे केली.त्यानंतर मुलगी विकत घेणारे आणि मध्यस्थ यांना ताब्यात घेतल्यानंतर,त्यांनी एकुणच घटनाक्रम सांगितला.त्यावर आम्ही आरोपी आई मीनल ओंकार सपकाळ,वडील ओंकार औदुंबर सपकाळ,दीपाली विकास फटांगरे, साहिल अफजल बागवान,रेश्मा शंकर पानसरे आणि सचिन रामा अवताडे या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आला आहे. या आरोपीकडे अधिक तपास करण्यात येत ( Pune Crime News ) असल्याचे त्यांनी सांगितले.