Team MyPuneCity – घाईगडबडीत चुकीच्या व्यक्तीच्या खात्यात पाठवले गेलेले ७५ हजार रुपये अवघ्या दहा मिनिटांत तक्रारदारास परत मिळवून देण्यात यश आले असून, ही उल्लेखनीय कामगिरी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी केली (Pune Crime News) आहे.
१६ मे २०२५ रोजी तक्रारदार इसम स्वतः पोलिस ठाण्यात येऊन त्यांनी माहिती दिली की, त्यांच्या वडिलांनी सकाळी ८.४५ वाजता आंध्रप्रदेशातील एका व्यक्तीच्या नंबरवर चुकून ₹७५,००० रक्कम पाठवली. संबंधित व्यक्ती ही रक्कम परत करण्यास टाळाटाळ करत असल्याचे तक्रारदाराने पोलिसांना सांगितले.
Yashwant Bank : यशवंत बँकेच्या १५० कोटीच्या घोटाळ्याची ‘सीबीआय’ चौकशी करावी
या घटनेची गांभीर्याने दखल घेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांनी पोलिस अंमलदार राहुल बांडे आणि दीपक शेंडे यांना त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले. दोन्ही अंमलदारांनी तत्काळ त्या व्यक्तीशी व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉलद्वारे संपर्क साधला. पोलिस असल्याची खात्री दिल्यानंतर, संबंधित व्यक्तीने दहा मिनिटांच्या आत संपूर्ण रक्कम तक्रारदारास परत केली.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त स्मार्तना पाटील आणि सहाय्यक पोलिस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यामध्ये वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलिस अंमलदार राहुल बांडे व दीपक शेंडे यांचे मोलाचे योगदान (Pune Crime News) लाभले.