situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News: बाणेरमधील दोन मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा; वेश्या व्यवसाय उघड, सहा आरोपींवर गुन्हे दाखल

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – बाणेर परिसरात मसाज सेंटरच्या आड वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर बाणेर पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करत सहा आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत. दोन्ही कारवायांमध्ये एकूण पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. ही मोहीम पुणे शहर पोलीस दलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आली.

पहिली कारवाई – वेदाथाय स्पा, बालेवाडी फाटा

८ मे २०२५ रोजी बाणेर पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी “वेदाथाय स्पा” या मसाज सेंटरवर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. सिग्नेट कॉर्नर, कोटक महिंद्रा बँकेच्या शेजारी, बालेवाडी फाटा येथे असलेल्या या स्पामध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली.

Daksh App : दक्ष ॲपच्या माध्यमातून उद्यान व्यवस्थापनात आणि कार्यक्षमतेत सुधारणा

या कारवाईत स्पा मॅनेजर मोहीमुद्दीन अहमद अली (वय २२, रा. वेदाथाय स्पा, बालेवाडी फाटा), स्पा मालकीण व जागेचा मालक या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील मोहीमुद्दीन अली याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरून तीन महिलांची सुटका केली असून त्यांना या व्यवसायात जबरदस्तीने व आर्थिक अमिष दाखवून ओढल्याचे उघड झाले आहे.

Vadgaon Accident : वाढदिवसाच्या दिवशी अंत्यसंस्काराची दुर्दैवी वेळ; कर्तव्य बजावताना कंटेनरच्या धडकेत पोलीस अंमलदाराचा दुर्दैवी मृत्यू

दुसरी कारवाई – २४ थाय स्पा, बाणेर

१२ मे २०२५ रोजी “२४ थाय स्पा”, शॉप नं. ६०४, ७४ टाउन बिल्डिंग, युनियन बँकेजवळ, बाणेर येथे पोलिसांनी अशीच दुसरी कारवाई केली. बनावट ग्राहकाच्या मदतीने खात्री करून पोलिसांनी छापा टाकला असता तेथेही वेश्या व्यवसाय सुरू असल्याचे आढळून आले.

या ठिकाणी स्पा मॅनेजर ज्योतीदेवी देवनारायण घोष (वय ३८, रा. स्मशानभूमीजवळ, गहुंजे), अमनगिरी गोस्वामी (वय २३, रा. फ्लॅट नं. ४०५, टेराग्रीन्स, रावेत), स्पा मालक व जागेचा मालक या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योतीदेवी घोष व अमनगिरी गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दोन पीडित महिलांची सुटका केली असून त्यांच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करवून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे.

कायदेशीर कारवाई

या दोन्ही कारवायांमध्ये संबंधित आरोपींविरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायदा १९५६ चे कलम ३, ४, ५ आणि भारतीय दंड संहितेतील कलम १४३(३)(५) अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही प्रकरणांत आरोपींनी महिलांना आर्थिक आमिष दाखवून वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले आहे. विशेष म्हणजे दोन्ही घटनांमध्ये जागा मालकांनी स्वतःची मालमत्ता या व्यवसायासाठी उपलब्ध करून दिली असल्याचे निष्पन्न झाले आहे, यामुळे त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन आणि पोलिसांची कामगिरी

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (पूर्व प्रादेशिक विभाग) मनोज पाटील, पोलीस उप-आयुक्त परिक्षेत्र ४ हिमंत जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (खडकी विभाग) विठ्ठल दबडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपाली पाटील, अविनाश कराड, रुपेश चाळके व पोलीस कर्मचारी भोरे, शिंगे, आहेर, काळे, इंगळे, बोराटे, बर्गे, मिसाळ, सोने, माळी, बागुल, सोनटक्के, खुडे, मपोशि पाटील यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

Follow Us On