Team My Pune City – सायबर पोलीस ठाण्यात दाखल (Pune Crime News)झालेल्या गुन्ह्यात एका ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणुकीचा पर्दाफाश झाला आहे. आरोपींनी खोट्या नफ्याचे आमिष दाखवून पुण्यातील एका नागरिकाची तब्बल 2 कोटी 24 लाख 70 हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी संतोष सदाशिव रुपनर (वय 47, रा. मांजरी बुद्रुक, पुणे) याला पोलिसांनी अटक केली आहे.
फिर्यादी अनिलकुमार दिवाकरन (वय 54 रा. म्हाळुंगे गाव, नांदे रोड, पुणे) हे ऑनलाईन शेअर मार्केट ट्रेडिंगचा व्यवसाय करतात. 8 जुलै 2025 ते 13 ऑगस्ट 2025 या कालावधीत आरोपींनी त्यांना व्हॉट्सअॅपवरील 310 bulls & chai आणि 305 bulls & chai या ग्रुपमध्ये सामील करून घेतले. त्यानंतर शेअर ट्रेडिंगद्वारे 40 ते 50 टक्के नफा मिळवून देण्याचे आश्वासन देण्यात आले.
फिर्यादीस CALVERT नावाचे अॅप्लिकेशन https://m.calvertfpi.com/ या लिंकद्वारे डाऊनलोड करण्यास भाग पाडले गेले. अॅपमध्ये खोटा नफा दाखवून तो मिळवण्यासाठी विविध बँक खात्यांमध्ये रक्कम भरण्यास सांगण्यात आले. नफा काढण्यासाठी कर (Tax) व इतर कारणे सांगूनही पैसे मागण्यात आले.
Bhaje Maval: श्री शिवाजी उदय मित्र मंडळ भाजे गणेशोत्सव मंडळाचा आकर्षक देखावा
Nana Peth Murder : असा होता खुनाचा घटनाक्रम, नाना पेठेत आज कडक बंदोबस्त
फिर्यादीकडून पैशांची वसुली करण्यात आरोपी दिपक नायर, राजीव भाटीया, पवित्रा वर्मा, रोहन शहा, गौरव मिश्रा, यशवंत राव, मिया विल्सन शहा यांच्यासह विविध मोबाईल क्रमांक व टेलिग्राम आयडी वापरणारे व्यक्ती सामील होते. तसेच फसवणुकीसाठी इंडसइंड बँक, बँक ऑफ बडोदा, अॅक्सिस बँक आणि डीसीबी बँक यांची खाती वापरली गेल्याचे तपासात समोर आले आहे.
सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. संतोष रुपनर याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.