Team My Pune City – राखी पौर्णिमेला भावाला ( Pune Crime News) बोलविल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याने उच्चशिक्षित विवाहित तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कात्रज भागातील आंबेगाव बुद्रुक भागात घडली. तरुणीचा शारिरिक आणि मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरुन भारती विद्यापीठ पोलिसांकडून पतीसह सासरकडील नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Kasba Ganpati : मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीच्या चांदीच्या मूर्तीची विधिवत पूजा संपन्न
स्नेहा विशाल झेंडगे (वय 27, रा. आंबेगाव बुद्रुक, कात्रज) असे आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणीचे नाव आहे. याबाबत स्नेहा यांचे वडील कैलास मच्छिंद्र ( Pune Crime News) सावंत (वय 55, रा. कर्देहळी, जि. सोलापूर) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पती विशाल झेंडगे, सासरे संजय झेंडगे, सासू विठाबाई झेंडगे, दीर विनायक झेंडगे, नणंद तेजश्री थिटे यांच्यासह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा आणि विशाल यांचा विवाह गेल्या वर्षी 2 मे 2024 रोजी झाला होता. विवाहानंतर काही दिवसांतच सासरकडील मंडळींनी ( Pune Crime News) कंपनी चालविण्यासाठी माहेरून 20 लाख रुपये आणण्याची मागणी केली. पैशांसाठी तिच्यामागे तगादा लावण्यात आला. पैशांसाठी स्नेहाला वारंवार शिवीगाळ, तसेच मारहाण केली होता. तिचा शारिरिक आणि मानसिक छळ केला.
छळ असह्य झाल्याने स्नेहाने पतीसह नातेवाईकांविरुद्ध यापूर्वी पोलिसांकडे तक्रार केली होती. मात्र, सासरे संजय झेंडगे यांचा साडू भाऊसाहेब कोल्हाळ याने तिला दमदाटी करून तक्रार मागे घेण्यास भाग पाडले होते. तक्रार मागे घेतल्यानंतरही स्नेहाचा छळ सुरू होता. राखी पौर्णिमेला भावाला बोलाविल्यास त्याला जिवे मारू, अशी धमकी तिला देण्यात आली ( Pune Crime News) होती.