Team My Pune City – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर एका प्रवाशाला धमकावून लुटणाऱ्या मोटारचालकासह साथीदाराला सिंहगड रस्ता पोलिसांनी (Pune Crime News)गजाआड केले. चोरट्यांकडून गुन्हा करण्यासाठी वापरलेली मोटार आणि मोबाइल संच असा 4 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Pune Crime News : बुरखाधारी महिलांकडून सराफी पेढीतून 5.22 लाखांच्या दागिन्यांची चोरी
निखील अरविंद पवार (वय 27, रा. मातोश्रीनगर, आंबेगाव बुद्रुक, कात्रज), रोहन शाम पवार (वय 27, रा. नऱ्हे ) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 30 मे रोजी रात्री तक्रारदार तरुण मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर बसची वाट पाहत थांबला होता. तो कोल्हापूरला निघाला होता. त्या वेळी आरोपी पवार हे मोटारीतून तेथे आले. त्यांनी तरुणाला कोल्हापूरला सोडतो, अशी बतावणी केली. त्यानंतर धावत्या मोटारीत पवार आणि साथीदारांनी तरुणाला शस्त्राचा धाक दाखविला.
Krishnarao Bhegde : कृष्णराव भेगडे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडून भावपूर्ण श्रद्धांजली
तरुणाला मारहाण करुन त्याच्याकडील रोकड, मोबाइल संच, सोनसाखळी असा मुद्देमाल लुटून आरोपी पवार पसार झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. पसार झालेल्या चोरट्यांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले होते. प्रवासी तरुणाला लुटणारा चोरटा नऱ्हे भागातील भूमकर चौकात थांबल्याची माहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात(Pune Crime News) घेतले.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहायक आयुक्त अजय परमार यांच्या मार्गदर्शनाखाली सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप दाईंगडे, गुन्हे शाखेचे निरीक्षक उत्तम भजनावळे, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर, संजय शिंदे, उत्तम तारू, अण्णा केकाण, विकास बांदल, राहुल ओलेकर, गणेश झगडे, विनायक मोहिते, सतीश मोरे, संदीप कांबळे, तानाजी सागर, समीर माळवदकर, शिरीष गावडे यांनी ही कारवाई (Pune Crime News) केली.