Team MyPuneCity -विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये भीषण अपघात झाला आहे. एका कार चालकानं सदाशिव पेठेत असलेल्या भावे हायस्कूल जवळ बारा जणांना उडवलं आहे.हि घटना आज शनिवारी सायंकाळी पावणे सहाच्या सुमारास घडली आहे. हे बाराही जण एमपीएससीचे विद्यार्थी असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेतील जखमींना पुण्यातील संचेती व मोडक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अपघात घडला तेव्हा कर चालक हा मद्यधुंद अवस्थेमध्ये होता. त्याचं वाहनावरील नियंत्रण सुटून वाहनाच्या अॅक्सिलेटरवर दाब पडला, त्यामुळे कारचं स्पीड अचानक वाढलं, अनियंत्रित झालेल्या कारने या चहाच्या दुकानसमोर पार्क केलेल्या गाड्या आणि तिथे असलेल्या लोकांना धडक दिली. या अपघातामध्ये एकूण बारा जण जखमी झाले आहेत, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेनंतर आरोपी चालक जयराम मुळे (वय 27, बिबवेवाडी) याला विश्रामबाग पोलिसांनी अटक केली असून ,तो मद्यधुंद असल्याचे सांगितले जात आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या अपघातामध्ये कोणाचाही मृत्यू झाल्याचं वृत्त नाहीये.
जखमी विद्यार्थ्यांची नावे पुढील प्रमाणे
अविनाश दादासो फाळके ,प्रथमेश पांडुरंग पतंगे ,संदीप सुनील खोपडे ,सोनाली सुधाकर घोळवे ,मंगेश आत्माराम सुरवसे ,अमित अशोक गांधी ,समीर श्रीपाद भालचीकर ,सोमनाथ केशव मेरुकट ,प्रशांत ब्रह्मदेव बंडगर ,किशोर हरिभाऊ भापकर ,पायल आदेश कुमार दुर्गे ,गुलनाज सिराज अहमद .