Team My Pune City – राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राच्या पथकाने ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडीट सोसायटी लिमिटेड ( Pune Crime News) (जि. बीड) प्रकरणात दीड वर्षांपासून फरार असलेल्या प्रमुख आरोपी अर्चना सुरेश कुटे (पत्नी अध्यक्ष सुरेश कुटे) व संचालक आशा पाटोदेकर यांना अखेर अटक केली आहे. ही धडक कारवाई मंगळवारी (दि. 16 सप्टेंबर) पुणे येथे करण्यात आली.
Rashi Bhavishya 17 Sept 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्याप्रकरणी चेअरमन, व्हाईस चेअरमन, सचिव, अधिकारी व संचालक मंडळाच्या विरोधात मे 2025 पासून आतापर्यंत तब्बल 95 गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राकडे सुरू असून, यापूर्वी मुख्य आरोपी अध्यक्ष सुरेश गानोबा कुटे याला अटक झाली होती. त्याची पत्नी व बिझनेस प्रमोटर अर्चना कुटे ही ( Pune Crime News) दीड वर्षांपासून फरार होती.
Pune: परप्रांतियांचा मुंबईत मराठी भाषेला विरोध अयोग्यच – विश्वास पाटील
यापूर्वी 11 सप्टेंबर रोजी पुण्यात छाप्यामध्ये अर्चना कुटेच्या ताब्यातून 2 कोटी 10 लाख 75 हजार 320 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. यात 60 तोळे सोने (किंमत 80.90 लाख), 270 तोळे चांदी (किंमत 56.75 लाख), रोकड 63 लाख, तसेच बीएमडब्ल्यू स्कूटी (किंमत 10 लाख) असा समावेश आहे. ही संपत्ती अपहारातून उभी केल्याचा ( Pune Crime News) संशय आहे.
गुन्हे अन्वेषण विभाग व एमपीआयडी अंतर्गत आर्थिक गुन्हे शाखा, बीड यांनी मिळून 207 मालमत्तांचे प्रस्ताव जप्तीसाठी सादर केले आहेत. संचालक मंडळातील एकूण 13 आरोपींपैकी 9 जणांना आतापर्यंत अटक झाली असून, अर्चना कुटे व आशा पाटोदेकर यांच्या अटकेनंतर ( Pune Crime News) तपासाला अधिक वेग आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस महासंचालक सुनिल रामानंद, पोलीस उपमहानिरीक्षक अमोघ गावकर, पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, अपर पोलीस अधीक्षक किरण पाटील, उपअधीक्षक स्वाती थोरात, पोलीस निरीक्षक विजय पणदे, पोलीस हवालदार कारभारी गाडेकर व देवचंद घुणावत, तसेच चालक सय्यद रफिक यांनी ( Pune Crime News) केली.