Team MyPuneCity – सिम्बायोसिसमध्ये प्रवेश मिळवून देतो, असे सांगून बनावट वेबसाईटच्या माध्यमातून विद्यार्थ्यांकडून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील ( Pune Crime News) फरार आरोपीला पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोलकाता विमानतळावर थायलंडला पळून जात असताना अटक केली आहे. अटक करण्यात आलेला आरोपी कुमार कुणाल बिरेंद्रकुमार विद्यार्थी (वय ३०, मूळ रा. बिहार) याच्यावर यापूर्वीदेखील सायबर फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना आढळून आले की, आरोपी कुणाल कुमार याने सहकाऱ्यांसह सिम्बायोसिस संस्थेच्या नावाचा गैरवापर करत खोटे वेबपेज तयार केले होते. त्या वेबपेजवर सिम्बायोसिस संस्थेचा लोगो व इमारतीचा फोटो वापरून ती अधिकृत वेबसाइट असल्याचा भास निर्माण केला गेला होता. या माध्यमातून ‘सिम्बायोसिसमध्ये प्रवेश मिळवून देतो’ असे सांगत विद्यार्थ्यांना फसवले जात होते. प्रवेशासाठी अधिकचे पैसे उकळले जात होते. यासंदर्भात दिव्या, आकाश यादव आणि कुणाल कुमार या तिघांविरुद्ध २ एप्रिल २०२५ रोजी डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा नोंदवूनही आरोपी फरार ( Pune Crime News) होते.
Pune Crime News : सराफी पेढीतील कर्मचारी तरुणाने साडेचार कोटी रुपयांच्या दागिन्यांची केली चोरी
गुन्हा दाखल झाल्यानंतर अंमली पदार्थ विरोधी पथकाने दिल्ली व हरियाणामध्ये या आरोपींचा तीन वेळा पाठलाग केला. मात्र आरोपी पोलीसांना चकवा देत पळून जात होते. अखेर लुकआऊट नोटीस जारी करून आरोपीचा दिल्ली, हरियाणा आणि महाराष्ट्रात कसून शोध सुरू ठेवण्यात आला. तपासादरम्यान आरोपी कुमार कुणाल याचा मागील गुन्हेगारी इतिहास समोर आला. सायबर पोलीस स्टेशन, पुणे येथे २०२१ मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल असून, त्या गुन्ह्यातही तो फरार असल्याचे उघड झाले. न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळला ( Pune Crime News) होता.
पोलिसांना ३१ मे रोजी खात्रीशीर माहिती मिळाली की आरोपी आपल्या पत्नीसमवेत थायलंडला कोलकाता विमानतळावरून जाण्याच्या तयारीत आहे. तात्काळ गुन्हे शाखेच्या पथकाने कोलकात्यात जाऊन विमानतळावर सापळा रचला आणि आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला पुण्यात आणून अटक दाखल करून ५ जून २०२५ पर्यंत पोलिस कोठडी मिळवण्यात आली आहे. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक उल्हास कदम (अंमली पदार्थ विरोधी पथक १, गुन्हे शाखा, पुणे शहर) हे करत आहेत.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखील पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे-१) गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक उल्हास कदम, सहायक पोलीस निरीक्षक अनिकेत पोटे आणि पोलीस अंमलदार प्रविण उत्तेकर, दत्ताराम जाधव, संदीप शिर्के, विशाल दळवी, मारुती पारधी, संदेश काकडे यांचा ( Pune Crime News) समावेश होता.