Team MyPuneCity – आंबेगाव खुर्द येथील एका २९ वर्षीय महिलेला( Pune Crime News 9 May 2025) टेलिग्रामद्वारे ‘रिव्यू व रेटिंग’च्या माध्यमातून दिवसाला दोन ते तीन हजार रुपये कमविण्याचे आमिष दाखवत एकूण ₹ 14,30,410 इतकी रक्कम ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास लावून सव्वा चौदाशे रुपयांची फसवणूक करण्यात आली. आरोपींनी सुरुवातीला काहीशा नफ्याचा परतावा देऊन विश्वास संपादन केला. मात्र नंतर कोणताही परतावा न देता ही रक्कम परस्पर लंपास केली. ही घटना १२ जुलै २०२४ ते १४ जुलै २०२४ दरम्यान घडली. आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून संशयितांमध्ये मोबाईल, टेलिग्राम आयडी व बँक खातेधारकांचा समावेश आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
डेबिट कार्ड अॅक्टिवेशनच्या नावाखाली ६१ वर्षीय व्यक्तीची सव्वा तीन लाखांची फसवणूक ( Pune Crime News 9 May 2025)
कोंढवा खुर्द परिसरातील ६१ वर्षीय इसमाची डेबिट कार्ड अॅक्टिवेट करण्याच्या बहाण्याने ओळख गोपनीय माहिती मिळवून ऑनलाईन फसवणूक करण्यात आली. पीडिताच्या बँक खात्यातून तब्बल ₹ 3,68,600 इतकी रक्कम काढून घेण्यात आली. ही घटना दिनांक १५ मार्च २०२५ रोजी त्यांच्या राहत्या घरी ऑनलाईन माध्यमातून घडली. कोंढवा पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल असून गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अब्दुल रौफ शेख करत आहेत.
Pune News : बुद्ध पौर्णिमेनिमित्त आंबेडकर स्मारक परिसरातील वाहतूक मार्गात तात्पुरते बदल
खडकीतील मंगल कार्यालयातून ₹२.०७ लाखांचे भांडी चोरीला, तिघे अटकेत ( Pune Crime News 9 May 2025)
प्रतीक मंगल केंद्र आणि राजमोहन चौक, खडकी बाजार येथून उघड्यावर ठेवलेली सुमारे ₹ 2,07,000 किमतीची भांडी चोरल्याप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींची नावे सौरभ संजय पळसे (२३, रा. धनकवडी), सोमनाथ मारुती बर्गे (३६, रा. सातारा) आणि प्रसाद राजेंद्र भरेकर (३६, रा. आंबेगाव पठार, पुणे) अशी आहेत. ही चोरी २५ ते २६ एप्रिल दरम्यान घडली. खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक चौगुले करीत आहेत.
कामाचे आमिष दाखवत ज्येष्ठ महिलेला गाठले, मंगळसूत्र लंपास ( Pune Crime News 9 May 2025)
येरवडा येथील ७० वर्षीय महिला चालत घरी जात असताना, दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांना “काम हवे का?” असे विचारून थांबवले आणि त्यांच्या गळ्यातील सुमारे ₹25,000 किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. ही घटना ९ मे २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजण्याच्या सुमारास कामराजनगरमधील अलहिलाल कलेक्शनसमोर घडली. येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक नंदनवार करीत आहेत.
Maval News : मावळ मनसेचा मोठा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर….इंजिन थांबवून तुतारी फुंकणार ?
एटीएममध्ये मदत करण्याच्या बहाण्याने वृद्धाची एक लाखांची फसवणूक ( Pune Crime News 9 May 2025)
बोपोडीतील ६३ वर्षीय इसमाने ९ मे रोजी खडकी बाजारातील बाटा शोरूमजवळील बँक ऑफ इंडिया एटीएममध्ये पैसे काढण्याचा प्रयत्न केला असताना, एक अनोळखी इसम त्यांच्या पाठीमागे उभा राहून मदतीचा बहाणा करून त्यांचे एटीएम कार्ड हिसकावून पळून गेला. त्यानंतर त्याच कार्डाचा वापर करून एकूण ₹1,04,650 इतकी रक्कम काढण्यात आली. खडकी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास पोलीस अमलदार इम्रान मुलाणी करत आहेत.