situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 30 May 2025 : हडपसरमध्ये ऑनलाईन टास्कच्या नावाखाली ४३ लाखांची फसवणूक

Published On:
Pimpri Chinchwad Crime News 23 July 2025

Team MyPuneCity – हडपसर येथील ३८ वर्षीय महिलेची ऑनलाईन टास्कच्या नावाखाली ४३,९१,१६० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या माहितीनुसार, ३ ते ८ मे २०२५ दरम्यान, अज्ञात मोबाईलधारकाने तिला विविध टास्क पूर्ण करण्याचे आश्वासन देत तिच्या UPI आयडी व बँक खात्यावर पैसे पाठविण्यास भाग पाडले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अद्याप अटकबाह्य आहेत.


ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९.५ लाखांची फसवणूक

सिंहगड रोड परिसरातील ४७ वर्षीय इसमाची ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने ९,५०,००० रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, २ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर २०२४ दरम्यान, अज्ञात मोबाईलधारकाने त्यांचा विश्वास संपादन करून दिलेल्या बँक खात्यावर पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले. परंतु, कोणताही परतावा न देता त्यांची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

PCMC : बकरी ईदनिमित्त आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली नियोजन बैठक


आंबेगावमध्ये चार अनोळखी इसमांकडून जबरी चोरी

आंबेगाव खुर्द येथील शांताई हाइट्समध्ये २७ मे रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान, ३४ वर्षीय इसमाच्या घरी चार अनोळखी इसम व एका महिलेने जबरदस्तीने प्रवेश करून त्याला मारहाण केली. त्यांनी फिर्यादीच्या फोन पे खात्यातून ८५,००० रुपये ट्रान्सफर करून घेतले आणि ऑफिस बॅगेतील ४२,००० रुपये रोख, लॅपटॉप व शैक्षणिक कागदपत्रे असा एकूण १,२७,००० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने चोरून नेला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोमवार पेठेत झेरॉक्स दुकानातून ६ लाखांचे प्रिंटिंग हेड्स चोरी

सोमवार पेठेतील गॅलक्सी झेरॉक्स दुकानातून २८ मे रोजी पहाटे ३.५० ते ४.१८ वाजेच्या दरम्यान, अज्ञात इसमाने दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्याने ६,००,००० रुपयांचे पलेक्स प्रिंटिंग मशीनमधील चार कलरचे प्रिंटिंग हेड्स चोरी करून नेले. या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.


फुरसुंगीमध्ये घरफोडी करून १.९ लाखांचे दागिने चोरी

फुरसुंगी येथील मातृछाया बिल्डिंगमध्ये २८ मे रोजी दुपारी १२ ते रात्री १०.३० वाजेच्या दरम्यान, अज्ञात इसमाने ३४ वर्षीय इसमाच्या घराचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. त्याने बेडरूममधील लोखंडी कपाटातील १,९०,००० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केले. या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


स्वारगेट बसस्थानकात ७६ वर्षीय इसमाच्या गळ्यातील ९५,००० रुपयांची सोनसाखळी चोरी

स्वारगेट बसस्थानकात १७ मे रोजी सकाळी ७.३० वाजता, ७६ वर्षीय इसमाच्या गळ्यातील ९५,००० रुपयांची सोनसाखळी अज्ञात इसमाने गर्दीचा फायदा घेऊन चोरी केली. फिर्यादी हे स्वारगेट ते भोर एस.टी. बसने प्रवास करत होते. या प्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बंडगार्डन परिसरात ५२ वर्षीय इसमाचा अपघातात मृत्यू

२४ मे रोजी दुपारी १ वाजता, पुणे स्टेशन पोलीस चौकीसमोर भिंतीलगत ब्रिजवर ५२ वर्षीय सिद्धार्थ नामदेव गवारे यांना अज्ञात वाहनचालकाने भरधाव वेगाने वाहन चालवत (Pune Crime News 30 May 2025) धडक दिली. या अपघातात गवारे गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. अपघातानंतर वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू आहे.

Follow Us On