Team MyPuneCity – पुणे-नगर रस्त्यावरील विठ्ठलवाडी बसस्टॉप परिसरात एका २० वर्षीय तरुणीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून दोन दुचाकीस्वारांनी धूम ठोकली. ही घटना १९ मे २०२५ रोजी दुपारी १.४४ वाजता घडली.
फिर्यादी महिला विठ्ठलवाडी बसस्टॉपवर थांबलेल्या असताना, अनोळखी दोन तरुण दुचाकीवर आले आणि तिच्या गळ्यातील सुमारे १ लाख ३९ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून पसार झाले. या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करत आहेत.
हडपसरमध्ये पायी चालत असलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले
पुणे-सोलापूर रोडवरील पिटर इंग्लंड शोरूमजवळ एका ५५ वर्षीय महिलेला दुचाकीवरील चोरट्यांनी लुटले. २६ मे २०२५ रोजी रात्री ८.३० वाजता ही घटना घडली.
फिर्यादी महिला रस्त्याने पायी चालत असताना, दोन अनोळखी इसम दुचाकीवरून आले आणि त्यांच्या गळ्यातील अंदाजे ३५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून निघून गेले. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक हसीना शिकलगार या करत आहेत.
धायरीतील फ्लॅट फोडून सव्वा आठ लाखांचा ऐवज चोरीला
उंबऱ्या गणपती चौकाजवळील राजब्लीस सोसायटीतील फ्लॅटमध्ये चोरट्यांनी घरफोडी करत सुमारे ८ लाख ४६ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. २६ मे २०२५ रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास ही घटना घडली.
फिर्यादी इसम हे त्यांच्या फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेले होते. त्यावेळी अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश केला. कपाटातील ४५ हजार रुपये रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण ऐवज चोरून नेण्यात आला. नांदेड सिटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून, तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष कदम करीत आहेत.
हडपसरमध्ये बंद घर फोडून चोरी, आरोपी अद्याप फरार
हडपसर येथील बी/७ परिसरात एका बंद घराचा दरवाजा उचकटून अज्ञात चोरट्यांनी घरफोडी केली. २६ मे २०२५ रोजी रात्री १० ते २७ मे रोजी दुपारी १ या कालावधीत ही घटना घडली.
फिर्यादी हे त्यांच्या घरी नसताना, अज्ञात चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केला. घरातील ऐवज चोरीला गेला असून पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pune Accident News : कचरा वाहतूक करणार्या डंपरच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणीचा मृत्यू
मांजरी बुद्रुकमध्ये घरफोडी; अज्ञात चोरट्याचा शोध सुरू
साईराम नगरमधील ढेरे बंगला समोर असलेल्या घरात चोरट्यांनी प्रवेश करून घरफोडी केली. घटना २६ मे ते २७ मे २०२५ दरम्यान घडली.
फिर्यादी यांचे घर कुलूप लावून बंद होते. त्यादरम्यान अज्ञात चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि ऐवज चोरून नेला. हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून अधिक तपास सुरू आहे.