situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 20 May 2025 : लोहगाव रोडवर भरधाव टेम्पोने दुचाकीस्वाराला चिरडले; तरुणाचा मृत्यू

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –लोहगाव येथील एअरपोर्ट रोडवर एका भरधाव टेम्पोने दुचाकीस्वार तरुणाला जोरदार धडक दिल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना दि. १८ मे २०२५ रोजी दुपारी ३.४० वाजता भिवरे गॅरेजसमोर घडली.

पवनकुमार सिंह (वय २९, रा. वाघोली, पुणे) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांचे भाऊ रौशनकुमार सिंह (वय २४, रा. जी-विंग, विजय विहार, फायर स्टेशनजवळ, वाघोली) हे दुचाकीवरून जात असताना टेम्पोचालकाने वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष करत हयगयीने वाहन चालवले व त्यांना उजव्या बाजूने जबर धडक दिली. यामध्ये रौशनकुमार गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडले.

या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार ए. एस. आदर्लिंग करीत आहेत.

Chikhali: चिखलीतील ३६ बंगल्यांच्या तोडफोडीमागे ‘झोनिंग’ माहितीचा अभाव; ‘Right to Purchase’ कायद्याची मागणी


कोथरुडमधील महिलेची शेअर ट्रेडिंगच्या नावाखाली ३३ लाखांची फसवणूक

ऑनलाईन शेअर ट्रेडिंगमध्ये गुंतवणुकीवर भरघोस नफा मिळेल असे सांगून एका ५२ वर्षीय महिलेला तब्बल ३३ लाख ४९ हजार ७०५ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

या प्रकरणी कोथरुड येथील रहिवासी ५२ वर्षीय महिलेने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मोबाईल धारक व लिंक धारकाने (वय अंदाजे ३५ वर्षे, रा. कोथरुड, पुणे) दि. २० मार्च २०२५ ते २८ एप्रिल २०२५ या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधून गुंतवणुकीसाठी आकर्षित केले.

पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम या प्रकरणाचा तपास करीत आहेत.


महिलेची ऑनलाईन शेअर गुंतवणुकीच्या नावाखाली १० लाखांची फसवणूक

कोथरुड परिसरातील आणखी एका महिलेला शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवून मोठा नफा मिळेल, असे सांगून १० लाख ६० हजार ५०० रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.

या प्रकरणात कोथरुड येथील ३५ वर्षीय इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार दि. ५ डिसेंबर २०२४ ते ६ जानेवारी २०२५ दरम्यान ऑनलाईन माध्यमातून घडला.

पोलिस निरीक्षक (गुन्हे) विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.


रात्रीच्या सुमारास स्प्रे फवारून लोखंडी हत्याराने हल्ला; युवक गंभीर जखमी

क्रांती चौक, म्हसोबा मंदिराजवळ रात्रीच्या सुमारास एका युवकावर अज्ञात इसमाने स्प्रे फवारून व लोखंडी हत्याराने हल्ला करत त्याला गंभीर जखमी केले. हल्लेखोराने “अली इराणी सोबत का फिरतोस?” असा जाब विचारत हल्ला केला.

ही घटना दि. १९ मे २०२५ रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास घडली. फिर्यादी २७ वर्षीय युवक (रा. रविवार पेठ, पुणे) यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.


वाघोलीत वृद्ध महिलेच्या गळ्यातील ९८ हजारांचे मंगळसूत्र दुचाकीस्वारांनी लुबाडले

वाघोली येथील आदित्यग्रीन सोसायटीजवळ एका ६५ वर्षीय महिलेला दुचाकीवरून आलेल्या दोघा अज्ञातांनी पत्ता विचारण्याच्या बहाण्याने गळ्यातील ९८ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले.

ही घटना दि. १८ मे २०२५ रोजी सकाळी ६.३० वाजता विठ्ठलवाडी परिसरात घडली. संबंधित महिलेनं वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करीत आहेत.


वाघोलीत बंद फ्लॅटचे कुलूप तोडून २ लाखांचे दागिने चोरी

साई सत्यम पार्क, वाघोली येथे अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅटचे कुलूप तोडून सुमारे २ लाख रुपयांचे दागिने आणि वस्तू चोरी केल्या.

ही घटना दि. ९ मे २०२५ ते १८ मे २०२५ दरम्यान फ्लॅट नंबर १०४, शांभवी पॅलेस येथे घडली. ४१ वर्षीय महिलेने या प्रकरणी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल करीत आहेत.


वारजेत चार अनोळखी इसमांनी पिस्तूलचा धाक दाखवून लूट केली

मुंबई-बेंगलोर हायवेवर वारजे परिसरात एका ४१ वर्षीय इसमावर चार अज्ञात इसमांनी पिस्तूलचा धाक दाखवून लुटमार केली. फिर्यादीकडून ३००० रुपये रोख आणि १० हजारांचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेण्यात आला.

ही घटना दि. १९ मे २०२५ रोजी पहाटे ३.५५ ते ४.२० च्या सुमारास घडली. फिर्यादी हे कोंढवे धावडे येथील रहिवासी आहेत.

तपास पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे करीत आहेत.

Follow Us On