Team MyPuneCity – बाणेर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ३७ वर्षीय व्यक्तीला सायबर गुन्हेगारांनी तब्बल ४० लाख २६ हजार ३१० रुपयांचा गंडा घातला( Pune Crime News 15 May 2025) आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना अज्ञात मोबाईल धारक आणि लिंक धारकाने गोल्ड ट्रेडिंगमध्ये आकर्षक परताव्याचे आमिष दाखवले. त्यांनी वेळोवेळी संदेश आणि गुंतवणुकीसाठी लिंक पाठवून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीने त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून प्लॅटफॉर्मवर गुंतवणूक केली आणि त्यानंतर त्यांची फसवणूक झाली. बाणेर पोलीस या सायबर गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.
———
Vadgaon Accident : पोलिस कॉन्स्टेबल मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल; दोघांना अटक
दत्तवाडीत दिवसाढवळ्या प्राणघातक हल्ला; तरुणावर धारदार हत्यारांनी वार ( Pune Crime News 15 May 2025)
दत्तवाडी परिसरात दुपारी दोनच्या सुमारास एका २२ वर्षीय तरुणावर जीवघेणा हल्ला झाला. फिर्यादी त्यांच्या घराच्याजवळ, शंकर मंदिराजवळ मित्रासोबत थांबले असताना, त्यांच्या ओळखीचा एक इसम आणि त्याच्या आठ साथीदारांनी दुचाकीवरून येत त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी फिर्यादीला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने धारदार हत्यारांनी आणि दगडविटांनी बेदम मारहाण केली, ज्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. पर्वती पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे.
———
आंबेगाव बुद्रुक येथे निष्काळजी टेम्पो चालकामुळे तरुणाचा बळी ( Pune Crime News 15 May 2025)
आंबेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे-मुंबई महामार्गावर सृष्टी लॉजसमोर एका निष्काळजी टेम्पो चालकाने एका ३९ वर्षीय पादचाऱ्याचा जीव घेतला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगा प्रसाद हे पायी रस्ता ओलांडत असताना, भरधाव वेगात आणि वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून आलेल्या टेम्पोने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा मृत्यू झाला. टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार झाला असून आंबेगाव पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
———
पर्वती परिसरात सोनसाखळी चोरी; महिला झाली शिकार ( Pune Crime News 15 May 2025)
पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत गजानन महाराज चौकातून ई लर्निंग चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्री दहाच्या सुमारास एका ५५ वर्षीय महिलेला सोनसाखळी चोरांनी लक्ष्य केले. दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी महिलेच्या गळ्यातील ९९ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जबरदस्तीने चोरून नेले. पोलिसांनी या जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.
———
Vadgaon Accident : पोलिस कॉन्स्टेबल मृत्यू प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल; दोघांना अटक
भवानी पेठेत टोळक्याची दहशत; तरुणावर प्राणघातक हल्ला ( Pune Crime News 15 May 2025)
खडक पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भवानी पेठेत एका हॉटेलमध्ये रात्री आठच्या सुमारास एका तरुणावर १२ जणांच्या टोळक्याने प्राणघातक हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या नातेवाईकाच्या मुलाला आरोपीच्या मुलापासून दूर ठेवण्यास सांगितल्याच्या रागातून हा हल्ला झाला. आरोपींनी फिर्यादीच्या भावाला आणि चुलत्याला लोखंडी हत्यारांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. हल्लेखोर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
———
विश्रामबागमध्ये एटीएम कार्ड बदलून ४८ हजारांची फसवणूक ( Pune Crime News 15 May 2025)
विश्रामबाग पोलीस स्टेशनच्या हद्दीत शास्त्री रोडवरील बँक ऑफ महाराष्ट्रच्या एटीएम सेंटरमध्ये एका ४५ वर्षीय व्यक्तीची ४८ हजार रुपयांची फसवणूक झाली. फिर्यादी पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेले असताना, एका अज्ञात व्यक्तीने चलाखीने त्यांचे एटीएम कार्ड बदलून दुसरे कार्ड दिले आणि त्यांच्या खात्यातील ४८ हजार रुपये काढले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादीने पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
———
काळेपडळ येथे दिवसाढवळ्या घरफोडी; लाखोंचे दागिने चोरी( Pune Crime News 15 May 2025)
कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील काळेपडळ येथे दिवसाढवळ्या घरफोडीची घटना घडली. एका ५० वर्षीय व्यक्तीच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश केला आणि बेडरूममधील कपाटातून २ लाख ४५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. पोलीस या घरफोडीचा तपास करत आहेत.