situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 14 May 2025 : ‘हाय रिटर्न’चं आमिष दाखवून ८.४९ लाखांची ऑनलाईन फसवणूक

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – विमाननगर येथे राहणाऱ्या एका ३९ वर्षीय व्यक्तीला ऑनलाईन गुंतवणुकीत चांगला नफा मिळवून ( Pune Crime News 14 May 2025)देण्याचे आमिष दाखवून सुमारे ८ लाख ४९ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात मोबाईल धारकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीस व्हॉट्सॲपवरून एका अज्ञात व्यक्तीने गुंतवणुकीची लिंक पाठवली. त्यामार्फत दरमहा चांगला नफा मिळवून देण्याचे आश्वासन देत त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर फिर्यादीकडून विविध टप्प्यांतून एकूण ८,४९,२६३ रुपये ऑनलाईन स्वरूपात उकळण्यात आले.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती आशालता खापरे करीत आहेत.


‘स्टॉक ट्रेडिंग’च्या आमिषाने ५.८८ लाखांची फसवणूक

पुणे – मुंढवा परिसरातील एका ४१ वर्षीय व्यक्तीला स्टॉक ट्रेडिंगद्वारे नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवत ऑनलाईन माध्यमातून ५ लाख ८८ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीला ऑनलाईन लिंक पाठवून अकाऊंट तयार करण्यास सांगण्यात आले. काही दिवसात ८९ हजार रुपये परतावाही देण्यात आला, परंतु मूळ गुंतवलेली रक्कम परत न करता उर्वरित ५.८८ लाखांची फसवणूक करण्यात आली.

या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) आशालता खापरे करत आहेत.

PCMC : पिंपरी चिंचवड शहर हद्दीतील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ लगत असणारे सेवा रस्ते होणार विकसित


ताडीवाला रोडवर भरधाव कारखाली चिरडून इसमाचा मृत्यू; चालक पसार ( Pune Crime News 14 May 2025)

पुणे – ताडीवाला रोड येथील सौरभ हॉलजवळ रस्त्याच्या मधोमध झोपलेल्या इसमाला भरधाव वेगात आलेल्या अज्ञात कारने चिरडल्याने त्याचा मृत्यू झाला. हा अपघात घडवून कार चालक घटनास्थळावरून पळून गेला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मृत इसमाचे नाव सरोज सुदर्शन बिश्वाल (वय ४५, रा. वडगावशेरी, मूळ रा. ओडिशा) असे आहे. हा अपघात १२ मे रोजी सकाळी ११ वाजता झाला. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप नवनाथ खेडकर करीत आहेत.


पीएमपीएमएल बसमधून वृद्ध महिलेची ९२ हजारांची बांगडी चोरीला ( Pune Crime News 14 May 2025)

पुणे – स्वारगेट ते औंध दरम्यान धावणाऱ्या पीएमपीएमएल बसमधील गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका ६० वर्षीय महिलेच्या हातातील सोन्याची बांगडी चोरून नेल्याची घटना घडली. बांगडीची किंमत सुमारे ९२ हजार रुपये आहे.

फिर्यादी महिला बसने प्रवास करत असताना कोणीतरी गर्दीचा फायदा घेत हातातील सोन्याची बांगडी चोरली. या प्रकरणी चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस अंमलदार शिर्के करत आहेत.

Talegaon Dabhade: सरस्वतीचा परम कुंभार मराठी माध्यमात दुसरा


मांजरीत बंद फ्लॅटचे कुलूप तोडून ३.९८ लाखांचा ऐवज चोरीला ( Pune Crime News 14 May 2025)

पुणे – मांजरीतील संत निरंकारी सोसायटीमध्ये बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप उचकटून चोरट्यांनी सुमारे ३.९८ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला. हडपसर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फ्लॅट बंद असताना चोरट्यांनी दरवाजाचे कुलूप उचकटले व कपाटातील ८,५०० रुपये रोख रक्कम, तसेच सोन्याचे व चांदीचे दागिने असा एकूण ३,९८,६०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी करत आहेत.


वारजे येथे रिक्षातील दोघांनी इसमाला मारहाण करून लूट केली ( Pune Crime News 14 May 2025)

पुणे – वारजे येथील म्हाडा वसाहतीजवळ रिक्षातून प्रवास करणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीस दोन अज्ञात इसमांनी मारहाण करत जबरदस्तीने मोबाईल व रोख रक्कम हिसकावून घेतली. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी कामावरून रिक्षाने जात असताना, दोघांनी लघुशंकेच्या बहाण्याने डोंगराळ भागात रिक्षा थांबवली व त्याठिकाणी त्यांना मारहाण करत ९,००० रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेतला. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित मोहिते करत आहेत.

Follow Us On