Team MyPuneCity –शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्री (Pimpri-Chinchwad Crime News 12 May 2025)करणाऱ्या तरुणाला महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई रविवारी (11 मे) सायंकाळी महाळुंगे गाव येथील साक्षी ट्रेडर्स या किराणा दुकानामध्ये करण्यात आली.
प्रिन्सकुमार राजेशकुमार अग्रहरी (18, महाळुंगे, खेड. मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अमोल वेताळ यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रिन्सकुमार याचे महाळुंगे गाव येथे किराणा दुकान आहे. त्याने किराणा दुकानामध्ये शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा विक्रीसाठी ठेवला. महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दुकानावर कारवाई करत दुकानातून एक लाख आठ हजार 461 रुपये किमतीचा गुटखा जप्त केला आहे.
Nigdi: टपरी मध्ये गांजा विक्री, एकास अटक
पुणे नाशिक महामार्गावर डंपरची दुचाकीला धडक
पुणे नाशिक महामार्गावर शिवाजीवाडी मोशी येथे एका डंपरने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दुचाकी वरील व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात शनिवारी (10 मे) सायंकाळी घडला.
शिवराम शिंदे असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी शिवराम यांचा मुलगा ऋषिकेश शिवराम शिंदे (36, भोसरी) यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार डंपर (एमएच 14/एल बी 3331) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sangurdi Road : इंदोरी ते सांगुर्डी रस्त्याच्या ₹ ७.६४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील शिवराम शिंदे आणि फिर्यादी यांची आई आंबेगाव येथून इंद्रायणी नगर भोसरी येथे दुचाकीवरून येत होते. पुणे नाशिक महामार्गावर शिवाजी वाडी मोशी येथे आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला एका डंपरने पाठीमागून धडक दिली. यामध्ये शिवराम शिंदे यांच्या पायाला आणि हाताला गंभीर दुखापत झाली आहे.
स्वयंघोषित भाईंची काळेवाडीत दहशत, तिघांना बेदम मारहाण (Pimpri-Chinchwad Crime News 12 May 2025)
आम्ही या भागातील भाई आहोत, असे म्हणत सात ते आठ जणांच्या टोळक्याने तिघांना बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (10 मे) रात्री ज्योतिबा गार्डन काळेवाडी येथे घडली.
प्रभू सुदाम शेलार (30, काळेवाडी) यांनी याप्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोहम गवळी, ऋषी बोरुडे, शंतनु शिंदे, रितेश कदम, संदेश पाटील आणि त्यांच्या तीन साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सोहम गवळी याने फिर्यादी शेलार यांना दुचाकीने धडक दिली. आम्ही या भागातील भाई आहे, असे म्हणून सोहम याने शेलार यांना तसेच त्यांचा मित्र प्रणव आणि शिवम यांना शिवीगाळ केली. आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दोन मित्रांना बेदम मारहाण केली. शिवम काळे आणि प्रणव रामगुडे यांच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्यांना गंभीर जखमी केले. आम्ही या भागातील भाई आहोत. तुम्ही यापुढे येथे दिसला तर तुम्हाला सोडणार नाही, अशी आरोपींनी धमकी दिली.
अल्कोहोल चेक केल्याने सुरक्षारक्षकास मारहाण
कंपनीत जाणाऱ्या कामगाराचे अल्कोहोल चेक केल्याने कामगाराने सुरक्षा रक्षकाला बेदम मारहाण केली. तसेच सुपरवायझरला शिवीगाळ केली. ही घटना शनिवारी (10 मे) रात्री सिनेक्रॉन कंपनी हिंजवडी येथे घडली.
सोमनाथ भगवान कानगुडे (35, घोटावडे, मुळशी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ईश्वर माधवराव माडे (25, हडपसर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ईश्वर माडे याची हिंजवडी येथील सिनेक्रॉन कंपनीला गाडी लावली आहे. तो शनिवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास कंपनीच्या गेटवर आला असता फिर्यादी सुरक्षारक्षक सोमनाथ यांनी मशीनद्वारे आरोपीचे अल्कोहोल चेक केले. याचा ईश्वर याला राग आला. त्याने सोमनाथ यांच्या सुपरवायझरला शिवीगाळ करून धमकी दिली. सोमनाथ यांच्यावर चाकूने वार करून त्यांना जखमी केले.