situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 11 May 2025 : बनावट कपडे विक्री प्रकरणी दुकानदारावर गुन्हा

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –अंडरआर्मर कंपनीच्या नावाचा आणि लोगोचा वापर करून बनावट कपडे विक्री केल्याप्रकरणी हिंजवडी येथील एका दुकानदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवारी (10 मे) सायंकाळी मेगा फॅशन या दुकानात करण्यात आले.

पुरन रंगलाल बोरवाल (45, कोथरुड पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल रत्नप्पा पुजारी (32, मुंबई) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंजवडी फेज तीन येथे मेगा फॅशन या दुकानामध्ये अंडरआर्मर कंपनीचे नाव आणि लोगो लावून बनावट कपडे विक्री होत असल्याची माहिती सुनील पुजारी यांना मिळाली. सुनील पुजारी हे अंडरआर्मर कंपनीमध्ये नोकरी करतात. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती देत दुकानामध्ये कारवाई केली. या कारवाईमध्ये एक लाख 44 हजार 800 रुपये किमतीचे बनावट ट्रॅकपॅन्ट टि-शर्ट, शॉर्ट व जॅकेट असे कपडे जप्त करण्यात आले आहेत.

Pushpalata D. Y. Patil Hospital: आंबी येथे लवकरच सुरु होणार भव्य ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’


कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक;तिघांना अटक

चाकण पोलिसांनी चाकण शिक्रापूर रोडवर कत्तलीसाठी जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच जनावरांची सुटका करण्यात आली. ही कारवाई शनिवारी (10 मे) सकाळी करण्यात आली.

श्याम प्रल्हाद खरसाडे (29), रामकिसन अच्युतराव खरसाडे (41), ओमकार रामकिसन खरसाडे (21, बीड) अशी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल संतोष फटांगरे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी त्यांच्या पिकप मध्ये पाच जनावरांना बांधून कत्तलीसाठी वाहतूक केली. याबाबत चाकण पोलिसांना माहिती मिळाली असता पोलिसांनी चाकण-शिक्रापूर रोडवर कारवाई करत पिकप ताब्यात घेतले. पिकप मधून 80 हजार रुपये किमतीच्या पाच जनावरांची सुटका केली. तसेच जनावरांची वाहतूक करणाऱ्या तिघांना ताब्यात घेतले.


दोन वेगवेगळ्या अपघातात एकाचा मृत्यू, एकजण जखमी

दापोडी आणि बावधन येथे झालेल्या दोन वेगवेगळे अपघात झाले. दापोडी येथील अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून बावधन येथील अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली आहे.

दापोडी येथील अपघातात फरहाना खान (35) या महिलेचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी इम्रान गनी खान (30, भोसरी) यांनी दापोडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार इंताजूर आफताब उद्दीन रेहमान (28, भिवंडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरहाना खान आणि त्यांची मुलगी कोंढवा येथून भोसरी येथे दुचाकीवरून जात होत्या. जुन्या पुणे मुंबई महामार्गावर दापोडी येथे त्यांच्या दुचाकीला पाठीमागून रेहमान याच्या ताब्यातील टेम्पोने धडक दिली. यामध्ये फरहाना खान यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.

बावधन येथील नांदे चौकात शनिवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अपघात झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने एका दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीवरील महिला गंभीर जखमी झाली. अपघात झाल्यानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला. जखमी महिलेने याप्रकरणी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ट्रक चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


किरकोळ कारणावरून तरुणास बेदम मारहाण

गाडी न दिल्याच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाचे अपहरण करून त्यास मारहाण केली. ही घटना भूगाव आणि कोथरूड येथे शुक्रवारी (9 मे) घडली.

याप्रकरणी जखमी तरुणाच्या आईने बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आशिष मेटकरी (25, कोथरूड), अण्णा गावडे (26, कोथरूड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांच्या मुलाला त्याची गाडी मागितली. त्या कारणावरून त्याला घराबाहेर बोलावून त्याचे एका कार मधून अपहरण केले. पौड येथील भदास येथे नेऊन त्याला बेदम मारहाण करून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये फिर्यादी यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. पोलिसांनी आशिष मेटकरी याला अटक केली आहे. बावधन पोलीस तपास करीत आहेत.

Follow Us On