situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 11 May 2025 :लोणी काळभोर येथे रस्ता दुभाजकाला धडकून दुचाकीस्वाराचा मृत्यू

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –भरधाव व निष्काळजी वाहन (Pune Crime News 11 May 2025)चालवण्याच्या निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातात समाधान संभाजी भिटे (वय ३१, रा. निरनिमगाव, ता. इंदापूर, जि. पुणे) या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना १० मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजून ५ मिनिटांनी कवडीपाट टोलनाका परिसरातील एस.आर. टायर दुकानासमोर घडली.

मयूर डोंगरे (वय २९, रा. मुंबई) हे फिर्यादी असून, ते व समाधान भिटे हे दोघे दुचाकीवरून प्रवास करत होते. वाहन चालवताना त्यांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करून निष्काळजीपणे गाडी चालवली. यामुळे टोलनाक्याजवळील डिव्हायडर त्यांच्या लक्षात न आल्याने दुचाकी त्यावर आदळली. अपघातात समाधान भिटे गंभीर जखमी झाले व जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे करत आहेत.


पर्वती दर्शनमध्ये घरफोडी; ५ लाखांचे दागिने चोरीला

कुलूप तोडून घरात घुसून चोरट्याने सुमारे ५ लाख ४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना पर्वती दर्शन परिसरात घडली. हा प्रकार २६ एप्रिल २०२५ ते १० मे २०२५ या कालावधीत अनंत बिल्डिंगमधील फ्लॅट नं. २०३ मध्ये घडला.
Maval News : मावळ मनसेचा मोठा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर….इंजिन थांबवून तुतारी फुंकणार ?

फिर्यादी नितीश मेहता (वय ३५, रा. पर्वती, पुणे) यांनी घर बंद असताना अज्ञात इसमाने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील दागिने चोरल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Dighi: दिघी मधून 13 किलो गांजा जप्त


बंद फ्लॅटमधून चोरी; ३.७८ लाखांचे दागिने लंपास

कुलूप तोडून फ्लॅटमधून ३ लाख ७८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरी केल्याचा प्रकार कॅसल रॉयल टॉवरमध्ये घडला. फेब्रुवारी २०२५ ते २ मे २०२५ या दरम्यान ही घरफोडी झाली.

फिर्यादी ४६ वर्षीय महिला या रेंजहिल्स येथे राहत असून, त्यांनी पोलीसांत दिलेल्या तक्रारीनुसार अज्ञात चोरट्याने दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला व कपाटातील दागिने चोरले. खडकी पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल असून तपास पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले करत आहेत.

वृद्ध दांपत्याची ३५ लाखांची फसवणूक; परिचरांनी एटीएम कार्डद्वारे रक्कम काढली

एका वृद्ध दांपत्याच्या देखभालीसाठी ठेवलेल्या दोन व्यक्तींनी विश्वासघात करून त्यांच्या बँक खात्यांतील सुमारे ३५ लाख ५१ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही फसवणूक सप्टेंबर २०२३ पासून मार्च २०२५ पर्यंत वेळोवेळी करण्यात आली.

फिर्यादी ७३ वर्षीय महिला या पाषाणमधील टियारा अपार्टमेंट्समध्ये राहत असून, त्यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, आरोपींनी वेकबुक आणि एटीएम कार्ड चोरून खोट्या सह्यांद्वारे त्यांच्या खात्यातून पैसे काढले. चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील करत आहेत.

Follow Us On