Team MyPuneCity – गुंतवणुकीवर भरघोस परताव्याचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १७ लाख ९५ हजार रुपयांची फसवणूक ( Pune Crime News 09 May 2025 ) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
याप्रकरणी अरणेश्वर, पुणे येथील ओपन ६७ वर्षीय इसमाने पर्वती पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. फेब्रुवारी २०२५ ते मार्च २०२५ दरम्यान आरोपी मोबाईल धारकाने फिर्यादी यांच्याशी संपर्क साधून, त्यांचे बनावट गुंतवणूक खाते तयार केले. गुंतवणुकीवर जास्त नफा मिळेल, अशा बहाण्याने वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरावयास लावून, कोणताही मोबदला दिला नाही. एकूण रक्कम १७,९५,००० रुपये इतकी आहे.
पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अमोल गोरे करत आहेत.
टेम्पोच्या धडकेत ३ वर्षांच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू ( Pune Crime News 09 May 2025 )
पुणे – भरधाव वेगात टेम्पो चालवणाऱ्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे रस्त्यावर खेळणाऱ्या ३ वर्षांच्या बालकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
आंबेगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत इरशाद सलमानी (वय २२, रा. कोळेवाडी रोड, जांभुळवाडी, हवेली) यांनी सांगितले की, ८ मे २०२५ रोजी दुपारी १२ वाजता अर्जुननगर, कोळेवाडी रोड, शिवाज्ञा बंगला समोर, त्यांचा पुतण्या अलताब नवशाद सलमानी (वय ३ वर्षे) खेळत असताना रस्त्यावर आला. त्यावेळी भरधाव टेम्पोने त्याला जोरदार धडक दिली. यात तो गंभीर जखमी होऊन मृत्युमुखी पडला.
टेम्पो चालकाविरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक एम. जी. वाघमारे करत आहेत.
Pimpri Chihcwad Crime News 9 May 2025 : डेबिट कार्डची माहिती घेऊन सव्वा लाखांची फसवणूक
भरधाव दुचाकीस्वाराच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक ठार ( Pune Crime News 09 May 2025 )
पुणे – रस्ता ओलांडत असताना भरधाव दुचाकीस्वाराच्या धडकेत एका ७० वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा प्रकार वारजे ते कर्वे रोडदरम्यान घडला.
फिर्यादी आशिष लांडे (वय ३८, रा. कोथरूड) यांनी अलंकार पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ८ मे रोजी सकाळी ७.४५ वाजता त्यांचे वडील पांडुरंग पोपटराव लांडे (वय ७०) हे कर्वे रोडवरील दादूस स्वीटजवळ रस्ता ओलांडत होते. त्यावेळी एक मोटारसायकलस्वार वेगात येऊन त्यांना धडकला. यात पांडुरंग लांडे यांचा मृत्यू झाला, तर दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला.
पोलिसांनी संबंधित चालकावर गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश दिक्षित करत आहेत.
नांदेडफाटा येथील कंपनीतून साडेतीन लाखांचा मशिनरी व जॉब्स चोरीला ( Pune Crime News 09 May 2025 )
पुणे – नांदेडफाटा येथील एका स्टील पॉलिश कंपनीत अज्ञात चोरट्याने सेंध घालून सुमारे ३.३५ लाखांचा मशिनरी व मेटल जॉब्स चोरून नेल्याची घटना घडली आहे.
४८ वर्षीय इसमाने नांदेड सिटी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, घटना २ मे ते ३ मे २०२५ दरम्यान घडली. संकल्प बंगलो लेनमधील मिश्र स्टील पॉलिश कंपनीत कोणीतरी अज्ञात इसमाने पत्रा उचकटून प्रवेश केला व ब्लोअर मशीन, ड्रिल मशीन, ग्राइंडर मशीन, तसेच मायक्रो इंडिया कंपनीचे १६ एलकेएच ९० केसींग जॉब्स असा एकूण ३,३५,०४० रुपयांचा ऐवज चोरून नेला.
तपास पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बुनगे करीत आहेत.
मुंबईतील महिलेच्या दागिन्यांची पुण्यातील सोहळ्यातून चोरी ( Pune Crime News 09 May 2025 )
पुणे – डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आलेल्या मुंबईतील एका महिलेचे तब्बल १० लाख ८० हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे.
४३ वर्षीय महिलेने उत्तमनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, त्या शिंदे पुलाजवळील आर्यक रेसीडेन्सीमध्ये आयोजित डोहाळे जेवणास हजर होत्या. कार्यक्रमानंतर त्यांनी त्यांची दागिन्यांची बॅग जागी ठेवली असता, कोणीतरी अज्ञात इसमाने ती बॅग चोरून नेली. बॅगेत सुमारे १०.८० लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने होते.
तपास सहायक पोलीस निरीक्षक अमृता चवरे करत आहेत.
टेलिग्रामवर पार्टटाईम जॉबचे आमिष देऊन २७ लाखांची फसवणूक ( Pune Crime News 09 May 2025 )
पुणे – टेलिग्राम अॅपद्वारे पार्टटाईम जॉबचे आमिष दाखवून पुण्यातील ३७ वर्षीय इसमाची तब्बल २७.५२ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कोंढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला आहे.
फिर्यादींना एका टेलिग्राम आयडीधारकाने विविध ऑनलाईन टास्क पूर्ण करण्यास सांगितले व गुंतवणुकीच्या बहाण्याने त्यांच्याकडून २७,५२,०८९ रुपये उकळले. परंतु काम पूर्ण करूनही कोणताही मोबदला मिळाला नाही.
पोलिसांनी आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला असून तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. अब्दुल रौफ शेख करत आहेत.
Maval News : मावळ मनसेचा मोठा पदाधिकारी राष्ट्रवादीच्या वाटेवर….इंजिन थांबवून तुतारी फुंकणार ?
वेल्डिंगच्या कामादरम्यान अपघातात तरुणाचा मृत्यू; दोन इसमांवर निष्काळजीपणाचा गुन्हा ( Pune Crime News 09 May 2025 )
पुणे – गंजपेठेतील सिद्धार्थ मित्र मंडळाजवळील इमारतीवर वेल्डिंगचे काम करत असताना झालेल्या अपघातात २८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी दोन इसमांवर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेत मयत रोहित बाळू पवार (वय २८, रा. घोरपडी पेठ) हे २६ ऑगस्ट २०२३ रोजी सिद्धार्थ मित्र मंडळाजवळील दोन मजली इमारतीवर वेल्डिंगचे काम करत होते. दरम्यान, सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्यामुळे ते खाली पडले व त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यात दोन इसमांविरोधात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.