situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 07 June 2025 :वाघोलीतील भीषण अपघातात युवकाचा मृत्यू

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity –ट्रकचालकाच्या निष्काळजीपणामुळे वाघोली येथील गाडेवरती चौकात झालेल्या भीषण अपघातात ३७ वर्षीय युवराज पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अनिरुद्ध पाटील (वय २८, रा. यशोदा सुप्रीम, आळंदी) याने दिलेल्या माहितीनुसार, दि. ७ जून रोजी पहाटे चारच्या सुमारास ट्रकचालकाने भरधाव वेगात आणि अचानक वळण घेतल्याने युवराज यांच्या कारला ट्रकच्या मध्यभागी जोरदार धडक बसली. या अपघातात ते गंभीर जखमी झाले आणि घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावर न थांबता फरार झाला आहे.


शिवाजीनगरमध्ये टोळक्याचा हल्ला, एकावर गंभीर हल्ला

शिवाजीनगर येथील आशियाना बिल्डिंगसमोर मध्यरात्री टोळक्याने एका इसमावर लोखंडी हत्याराने हल्ला करत गंभीर जखमी केले.

या प्रकरणी आदित्य ऊर्फ बारक्या वडसकर (वय २२), अर्थद कदम (२४), रोहन शिंदे (२३), प्रथम मोहिते (२१) आणि चार अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाजीनगर पोलिसांनी प्रथम मोहितेला अटक केली आहे. हल्लेखोरांनी परिसरात दहशत माजवून गाड्यांचेही नुकसान केले.


जुना तोफखाना भागात पूर्वीच्या वादातून हल्ला, दोघे जखमी

मांजरी बुद्रुक येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून पाच इसमांनी एका कुटुंबावर हल्ला केला. लोखंडी हत्याराने केलेल्या हल्ल्यात फिर्यादी व त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाले.

जुना तोफखाना पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी गाडीच्या काचा फोडून परिसरात दहशत निर्माण केली. आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.


नवी पेठेत गप्पा मारत असलेल्या तरुणांवर हल्ला

शोभा टॉवर, पुना हॉस्पिटलजवळील पार्किंगमध्ये दोन तरुणांवर लोखंडी हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. यातील एक आरोपी प्रणव परदेशी (वय १९) याला अटक करण्यात आली आहे.

विश्रामबाग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी शिवीगाळ करून मारहाण केली. यानंतर त्यांनी १०,००० रुपये रोख व ८,००० रुपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. अधिक तपास सुरू आहे.


हडपसरमध्ये मंदिराजवळील घरातून अज्ञात चोरट्याची चोरी

गोधळेनगर, स्वामी समर्थ मंदिराजवळील रेणुका निवासमधून अज्ञात चोरट्याने शिरून घरफोडी केली. १ ते २ जून दरम्यान ही घटना घडली.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून आत प्रवेश करून ५०,००० रुपये रोख व सोन्याचे दागिने असा एकूण २.४५ लाखांचा ऐवज चोरून नेला. हडपसर पोलीस तपास करत आहेत.

वारजे माळवाडीत भांडण सोडविणाऱ्या युवकांवर हल्ला

एफ बिल्डिंग, म्हाडा वसाहत, वारजे माळवाडीत भांडण सोडविण्यास गेलेल्या युवकांवर लोखंडी हत्याराने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, बापू ऊर्फ सोन्या पवार (३०) व संतोष ऊर्फ गुड्डु काळे (२४) यांना अटक करण्यात आली असून दोघांचे साथिदार पसार आहेत. या हल्ल्यात फिर्यादी आणि त्याचा भाऊ गंभीर जखमी झाले आहेत.


वाघोलीत गोदामातून २ लाख रुपये किमतीच्या लोखंडी शिड्यांची चोरी

केसनंद येथील जय बाबा वेअर हाऊसमध्ये घोलप वस्ती येथे अज्ञात तीन चोरट्यांनी भिंतीवरून आत प्रवेश करून २ लाख रुपये किमतीच्या १७२ लोखंडी शिड्या चोरून नेल्या.

फिर्यादी हे या कंपनीत वेअरहाऊस ईनचार्ज म्हणून कार्यरत असून, त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाघोली पोलीस तपास करत आहेत. आरोपी फरार असून शोध सुरू आहे.


लोहगावमध्ये सलूनमधून १.५ लाखांची रोकड चोरी

लोहगाव येथील लक्झरी स्टार युनिसेक्स सलूनमध्ये चोरट्याने दुकानाचे शटर उचकटून १.५ लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली.

ही घटना दि. ६ ते ७ जूनदरम्यान घडली. विमानतळ पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. चोरीचा तपास सुरू आहे.

Follow Us On