situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 06 June 2025 : धायरी परिसरात महिलेचा खून; पैशाच्या वादातून गळा आवळून हत्या, आरोपी अटकेत

Published On:
Hinjawadi Crime News

Team MyPuneCity – धायरी परिसरातील सुर्य उज्वल हाइट्समध्ये एका ४० वर्षीय महिलेचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली असून, याप्रकरणी नितीन चंद्रकांत पंडीत (वय ५१, रा. निसर्ग हाइट्स, धायरी) या इसमाला पोलिसांनी अटक केली ( Pune Crime News)आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत महिला श्यामली कमलेश सरकार (वय ४०) या आरोपीच्या शेजारी राहत होत्या. काही काळापूर्वी आरोपीने त्यांना काही पैसे उसनं दिले होते. या पैशाच्या परतफेडीवरून त्यांच्यात वाद निर्माण झाला. ४ जून २०२५ रोजी दुपारी चारच्या सुमारास झालेल्या वादात आरोपीने रागाच्या भरात श्यामली यांचा ओढणीने गळा आवळून खून केला.

या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार निलेश तनपुरे यांनी फिर्याद दिली असून, पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गुरुदत्त मोरे करीत आहेत.


लोणी काळभोर येथे भरधाव टेम्पोची दुचाकीला धडक; तरुणाचा मृत्यू ( Pune Crime News)

पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाक वस्ती येथील जुनी ग्रामपंचायत समोर भरधाव टेम्पोने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत एका तरुणाचा मृत्यू झाला आहे.

फिर्यादी विठ्ठल कांबळे (वय ६३, रा. लोणी काळभोर) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मुलगा सुरेश विठ्ठल कांबळे (वय ३३) रात्री ११ वाजेच्या सुमारास दुचाकीवरून घरी जात असताना, टेम्पोने त्याला पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात सुरेश गंभीर जखमी झाला आणि त्याचा मृत्यू झाला.

टेम्पो चालकाने वाहतुकीचे नियम पाळले नसून, निष्काळजीपणे वाहन चालवून अपघात घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. चालक अद्याप फरार असून लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करीत आहेत.


कोथरूडमध्ये व्यवसायाच्या नावाखाली तरुणाची सव्वा दहा लाखांची फसवणूक

बर्गर किंग (पौड रस्ता) परिसरात व्यवसायासाठी कर्ज मिळवून देतो, असे सांगून एका ३० वर्षीय तरुणाची १०.४८ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

फिर्यादी तरुण बावधन येथील रहिवासी असून, सप्टेंबर २०२४ पासून त्यांच्याकडून ऑनलाईन व रोखीने पैसे घेण्यात आले. तिघा अनोळखी इसमांनी मिळून त्यांच्या विश्वासाला तडा देत ऑनलाईन ₹९.९८ लाख आणि रोख ₹५०,००० असे एकूण ₹१०,४८,५५१ उकळले.

कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत. पोलिस तपास सुरू आहे.


वानवडीत परीक्षा केंद्राबाहेर दुचाकीची डिक्की फोडून सव्वा दोन लाखांची चोरी ( Pune Crime News)

रामटेकडी परिसरातील आयकॉन डिजीटल झोन परीक्षाकेंद्राजवळ एका परीक्षार्थीच्या दुचाकीची डिक्की फोडून ₹२.२१ लाख रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला.

२३ वर्षीय फिर्यादी तरुण धायरी येथील रहिवासी असून, २ जून रोजी सकाळी ७.३० ते ११ दरम्यान परीक्षेला हजर राहण्यासाठी गेले होते. त्यांनी दुचाकी गेटसमोर पार्क केली असताना, डिक्कीमधील मोबाईल, मेमरी कार्ड, आधार कार्ड आणि दोन डेबिट कार्ड अज्ञात चोरट्याने चोरून नेले.

त्यानंतर डेबिट कार्ड वापरून त्यांच्या बँक खात्यातून पैसे काढण्यात आले. वानवडी पोलीस अज्ञात आरोपीचा शोध घेत आहेत.


कोंढव्यात फ्लॅटमध्ये घुसून सव्वा लाखांची चोरी ( Pune Crime News)

शिवनेरी नगर परिसरातील श्रीरामचंद्र अपार्टमेंटमध्ये एका बंद घराचे दार तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे १.३५ लाख रुपयांची चोरी केली.

५४ वर्षीय फिर्यादी घर बंद करून बाहेर गेले असताना, १ जून रोजी सायंकाळी अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून कपाटातील रोख ₹५०,००० आणि सोन्याचे दागिने चोरून नेले.

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Follow Us On