situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Crime News 06 June 2025 : कुदळवाडीत भरदिवसा दुचाकीस्वारांना ट्रकने चिरडलं; एक गंभीर जखमी

Published On:

Team MyPuneCity – कुदळवाडी ब्रिजजवळील चौकात भरदिवसा झालेल्या भीषण अपघातात ट्रकने एका अ‍ॅक्टीवा मोपेडस्वाराला जोरात धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील व्यक्ती गंभीर जखमी झाला असून संबंधित ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना दि. ५ जून २०२५ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास कुदळवाडी ब्रिजजवळ घडली. फिर्यादी इरफान इफराक खान (वय ३२, रा. खराळवाडी, पिंपरी) हे आपले नातेवाईक अच्युल्लाह मुस्तक बान (वय ३५) यांच्यासोबत अ‍ॅक्टीवा दुचाकी (एमएच १४ एलडी ९१७४) वरून केएसबी चौकाकडून कुदळवाडीकडे जात होते. दरम्यान, ट्रक (एनएल ०१ क्यू ५७८२) च्या चालकाने वाहन भरधाव वेगाने, अविचाराने चालवत दुचाकीला चिरडले. या घटनेत अच्युल्लाह यांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली असून शरीरावर इतर ठिकाणीही जखमा झाल्या.

चालकाने अपघात घडवून दिल्यानंतर घटनास्थळावरून पळ काढला. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि मोटार वाहन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोहवा चातुर अधिक तपास करत आहेत.


भाटनगर परिसरात दोन महिलांकडून गांजाची तस्करी; अटक

पिंपरीतील भाटनगर परिसरात अंमली पदार्थ विरोधी पथकाने कारवाई करत दोन महिलांविरोधात गांजाच्या बेकायदेशीर विक्रीप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका महिलेला अटक करण्यात आली आहे.

दि. ६ जून २०२५ रोजी सकाळी १०.२० वाजता भाटनगरमधील इमारत क-५ व क-६ यांच्या मधील मोकळ्या जागेत पोलिसांनी छापा टाकला असता, आरोपी महिला (वय २८) हिच्याकडून २५५ ग्रॅम गांजा (किंमत अंदाजे १२,७५०/- रुपये) आढळून आला. चौकशीत या महिलेनं हा गांजा दुसऱ्या महिलेपासून आणल्याची कबुली दिली.

या प्रकरणी पोलीस नाईक अजित कुटे यांनी फिर्याद दिली असून पिंपरी पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक देशमुख तपास करत आहेत.


मुळशी तालुक्यातून देशी बनावटीचे पिस्टल व काडतूस जप्त; एकास अटक

हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील माण परिसरात पोलिसांनी छापा टाकून एका व्यक्तीकडून देशी बनावटीचे पिस्टल व जिवंत काडतूस जप्त केले आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे.

दि. ६ जून २०२५ रोजी सायंकाळी ८ वाजता गोदरेज सोसायटीसमोरील रस्त्याच्या कडेला पोलिसांना संशयास्पद हालचाली दिसल्या. यावेळी गणेश सुनिल मोरे (वय ३३, रा. भुगाव, मुळशी) याच्याकडून ५१,००० रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.

विशेष म्हणजे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने दि. २८ मे ते १० जून २०२५ दरम्यान शस्त्रबंदी आदेश लागू केलेला असताना, आरोपीने हा आदेश झुगारून शस्त्र बाळगले. त्यामुळे आरोपीवर शस्त्र कायदा आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कांदे करत आहेत.

Follow Us On